Home

रायगड आणि मावळ मतदार संघासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कामे करावीत-आ.महेंद्र थोरवे यांचे आवाहन


 


रायगड आणि मावळ मतदार संघासाठी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे कामे करावीत : आ.महेंद्र थोरवे यांचे आवाहन



अलिबाग - अमुलकुमार जैन 


देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदीं सारख्याच सक्षम नेतृत्वाची गरज आहे.त्यांच्या कार्यकाळात अनेक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात विकासाची गंगा आली आहे. राज्यासह देशाला पुढे नेले आहे.आगामी लोकसभा निवडणुकीत रायगड आणि मावळ मतदार संघातील ज्या ज्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल त्यांना पाठबळ देऊन सर्वच कार्यकर्त्यांनी प्रामाणिक पणे कामे करावीत असे आवाहन कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पेण येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कार्यकारिणीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिवसेनेचे उपनेते आमदार भरतशेठ गोगावले, आ. महेंद्र दळवी, संपर्क नेत्या शिल्पाताई देशमुख, रायगड जेष्ठ जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, उत्तर रायगड जिल्हाप्रमुख संतोष भोईर, दक्षिण रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी, रामदास शेवाळे, प्रकाश देसाई, उत्तर रायगडच्या मेघाताई दमडे, संपर्क प्रमुख अरुण चाळके, महाराष्ट्र युवा सेनेचे सचिव विकास गोगावले, यांसह जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

महेंद्र थोरवे पूढे म्हणाले की,आता सर्व उपस्थितांनी आपले अनमोल विचार आपल्या भूमिका प्रखरपणे मांडल्या आहेत.नरेंद्र मोदी यांच्या गॅरंटीने देशाला आत्मनिर्भर बनविले आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिल पासून बैठका घेऊन यंत्रणा कार्यरत आहेत. तर रायगड जिल्ह्यात चुकीचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही. जे जे उमेदवार दिले जातील त्यांची कामे सर्वच कार्यकर्त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे करावीत असे आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.


Previous Post Next Post