Home

क्षात्रैक्य माळी समाजाच्या वतिने भव्य क्रिकेट पर्व 1 लिगचे आयोजन



 


क्षात्रैक्य माळी समाजाच्या वतीने भव्या क्रिकेट पर्व १ लीगचे आयोजन 


अलिबाग : रायगडमध्ये अलिबागच्या लहान लहान गावांत तसेच राज्यभर विखुरलेला क्षात्रैक्य माळी समाज एकत्र येऊन समाजातील मुलांचे क्रिकेट मधील कला गुण कौशल्य दिसावे. या हेतूने या चषकाचे आयोजन दि. २२ मार्च रोजी कुरुळ आझाद मैदान येथे करण्यात आले आहे. या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून अलिबागच्या इतिहासात पहिल्यांदाच एका व्यासपीठावर माळी समाज येणार आहे. स्पर्धेमध्ये १६ संघांनी सहभाग घेतला असून लीग स्वरूप (League format) मध्ये ह्या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत.


                 ्स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी दीपप्रज्वलन क्षात्रैक्य माळी समाजाचेच सर्व प्रमुख मान्यवर माजी जिल्हा परीषद अध्यक्ष सौ. सुप्रिया पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या रायगड जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख शंकर गुरव, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय पाटील, सावता माळी बँक चेअरमन रमेश नाईक, द्वारकानाथ नाईक, विजय कवळे, श्रीकांत कवळे, भूपेंद्र पाटिल, जयंत नाईक, जगदीश कवळे, मनोज राऊळ, श्रीनाथ कवळे, विजय म्हात्रे, सदिच्छा पाटील, अवधूत पाटिल, निलेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते तर वरील मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेला सूर्वात करण्यात आली.

Previous Post Next Post