रा.जि.प. शाळा धगडवाडी येथे शिक्षण परिषद संपन्न
रायगड (प्रतिनिधी)
रा. जि. प. शाळा धगडवाडी
ता.रोहा येथे मासिक शिक्षण परिषद सन्मा. सौ. मेघना धायगुडे मॅडम गटशिक्षणाधिकारी ता. रोहा यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजनाने झाली,श्रीम.सीमा गायकवाड व श्रीम.प्रिया शेंडे यांच्या सुंदर अशा ईशस्तवनाने वातावरण प्रसन्न झाले.
श्री. विजय भोसले यांनी सुत्रसंचलन केले. मा. गटशिक्षणधिकारी धायगुडे
मॅडमचा येरळ केंद्राच्या वतीने शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तसेच येरळ केंद्रात नवनियुक्त शिक्षणसेवक म्हणून विविध शाळांवर रुजू झालेले
श्रीम.सारिका पराड,श्रीम. कल्पना कदम,श्रीम.प्रिया शेंडे श्रीम.प्रियंका जाधव श्री. गोरख बागुल श्री.नागेश सुतार श्री. राठोड आदि नवनियुक्त शिक्षकांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख श्री. कुंदन जाधव सर यांनी केले. केंद्रस्तरीय निपुण भारत अभियान कार्यक्रमात प्रथम क्रमांक कामथ, द्वितीय क्रमांक येरळ व तृतीय क्रमांक चिंचवली तर्फे आतोणे शाळेने मिळवले. विजेते शाळांना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.परिषदेचे विषय - १.समग्र प्रगती पुस्तक श्री भागवत भुसारे सर यांनी २.सी सी ई मार्गदर्शन श्री प्रशांत वाघचौरे सर यांनी तर ३.व्यावसायिक मार्गदर्शन व मानसशास्त्रीय समुपदेशन या विषयी श्री अरुण शेळके सर यांनी सखोल अशी माहिती दिली.मा.धायगुडे मॅडमने शिक्षकांना मार्गदर्शन करत नवनियुक्त शिक्षणसेवकांना शुभेच्छा दिल्या.
यजमान श्री. राजेश म्हात्रे व भोसले सरांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली.
.jpg)