Home

मुरूड येथे शिक्षण परिषद मार्गदर्शन सम्मेलन संपन्न


 


शिक्षण विभाग मुरूड जंजिरा, शिक्षण परिषद  मार्गदर्शन संमेलन ‌संपन्न


मुरूड जंजिरा (प्रतिनिधी)


शिक्षण विभाग मुरूड जंजिरा, शिक्षण विभागातर्फे शिक्षण परिषद  संमेलन नगर परिषद शाळा नं १ मध्ये आयोजित करण्यात आले.    प्रथम केंद्रप्रमुख राजेश भोईर यांनी नगरपरिषद शिक्षण विभाग मुरूड प्रशासन अधिकारी आदरणीय दिपाली दिवेकर,माजी मुख्याध्यापिका  नैनिता‌ कर्णिक,शाळा नं‌ २ चे मुख्याध्यापक दिनेश भोईर सर, शाळा नं ४ घ्या मुख्याध्यापिका राजश्री गजने,सर्व उपस्थित शिक्षक वृंद यांचे‌ गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.कार्यक्रमात‌ सरल‌ प्रणाली विद्यार्थी नोंदणी, शिक्षण व्यवसाय मार्गदर्शन, मार्गदर्शक शाळा‌ नं १ चे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख ‌राजेश भोईर, शाळा नं ३ मुख्याध्यापिका कल्पना पेणकर, भरत शिंदे सर यांनी  विद्यार्थ्यांची सरल प्रणाली नाव नोंदणी ‌कशी केली जाईल, कल्पना पेणकर यांनी व्यवसाय मार्गदर्शनात माझी शाळा सुंदर शाळा या कार्यक्रमांतर्गत मुरूड मधील औद्योगिक क्षेत्रात प्रत्यक्ष नेऊन प्लबींग, सुतारकाम, शिवणकाम, इलेट्रीशन या विषयांची प्रात्यक्षिकासह माहिती दिल्याचे नमुद केले.तसेच ग्रंथ व्यवसाय विक्री,बेकरी व्यवसाय या बाबत‌ उदाहरणसह माहिती दिली.राजेश‌ भोईर यांनी इयत्ता ५वी‌ च्या‌ परीक्षेचे स्वरूप , प्रश्नपत्रिका बाबत योग्य असे मार्गदर्शन केले. प्रशासन अधिकारी दिपाली दिवेकर यांनी‌ इयत्ता ‌५वी प्रश्नपत्रिका,पट वाढविण्यासाठी प्रयत्न करणे.इयत्ता ८वी चां वर्ग सुरू करणे , शाळेच्या परिसरात लावलेली झाडांची में महिन्यात जोपासना करणे.तसेच नविन नियमानुसार परीक्षा पद्धतीचा उपयोग करणे.इत्यादीबाबत सखोल मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख‌ राजेश‌‌ भोईर यांनी सर्व मान्यवर उपस्थित शिक्षक वृंद यांचे आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता केली.


Previous Post Next Post