Home

महिला दिन... कवी प्रमोद सुर्यवंशी


 


 महिला दिन*


आई जिजाऊची माया सदा

सावित्रीबाई शिक्षण हिरकणी

महिलांना मोठे स्थान देऊन ही

झाल्या जगाच्या खरचं जननी .... १


मदर तेरेसा सिंधूताई संकपाळ

कल्पना चावला असे किती नाव घेऊ

भारताचे नाव नेहमी उजवल करी

अशा थोर स्त्रियांना मानाचा मुजरा देऊ .... २


कलयुगात आता सदा सदा 

घेई रोज रोज खरचं भरारी

खांद्याला खांदा लावून स्त्रीया

जगते खरोखर ही सुंदर नारी .... ३


कधी आई कधी बहीण मावशी

मैत्रीण बायको नावे आहे सारी

अनेक रूप देवीची ही प्रेमळ 

म्हणून महिला दिन एकदम लयभारी ... ४


प्रमोद न सुर्यवंशी

     मुंबई

Previous Post Next Post