Home

तिचे अस्तित्व.... कवयित्री शरयु पाम्पट्टीवार



तिचे अस्तित्व


घडविते गर्भातच

कळा सोसूनी अनंत

माय वात्सल्याची मूर्ती

नसे प्रेमा तिच्या अंत....१

वेडी बहीणीची माया

सुखदुःखा साथ देई

सुखी पाहण्या भावंडा

दुःख पदरात घेई...२

गूज अंतरीचे सखे

कसे तुलाच कळते

ठेच मजला लागता

अश्रू तुझे ओघळते...३

अर्धांगिनी तुझ्या माझ्या

साता जन्माच्या गाठी

संकटात उभी सदा

राही तुच माझ्यापाठी...४

बोल बोबडे रसाळ

घर अंगणाची शान

लाड लाडली गोजिरी

कन्या माझी गुणवान....५

आई, अर्धांगिनी, कन्या

रूपे तुझी नाना नारी

दुःख चिंता संकटात 

कुटूंबाला तिच तारी...६

घरदार मन माझे

तिच्याविना शून्य भासे

तिचे अस्तित्व म्हणजे

जलाविना जसे मासे...७


सौ.शरयु पाम्पट्टीवार.

दिग्रस, यवतमाळ.


Previous Post Next Post