शेगावीचा राणा
शेगावीचा राणा
संत गजानन
प्रगटला आज
घेऊया दर्शन...१
महत्त्व सांंगण्या
उच्छिष्ट भक्षण
बंकट चकीत
पाहूनी लक्षण...२
निर्जल वापीस
तुडूंब भरीले
नौका तारूनिया
भक्तांस रक्षिले...३
आंबा फेकूनिया
क्षीण महारोग
लोकमान्य भेट
अनुपम योग...४
खांब पाडूनिया
भूत पळविले
बायजा भविष्य
स्पष्ट कळविले...५
अंगारा देऊनी
ज्वर बरा केला
भक्तांचा विश्र्वास
दृढत्वास नेला...६
गण गण बोते
जादूगार मंत्र
जपता बाबांस
सुरळीत तंत्र...७
सौ.शरयु पाम्पट्टीवार.
दिग्रस, यवतमाळ.
