Home

साहित्यसंपदातर्फे दिव्यांगांसाठी ऑनलाइन साहित्यसंलेन संपन्न





साहित्यसंपदातर्फे दिव्यांगांसाठी ऑनलाईन साहित्यसंलेन संपन्न


अलिबाग (सचिन पाटील)


 मराठी भाषा गौरवदिनाचे औचित्य साधून साहित्यसंपदातर्फे दिव्यांगांसाठी  ऑनलाईन साहित्यसंलेन आयोजित  करण्यात आले होते . सदर संमेलन दिनांक २७ फेब्रूवारी २४ रोजी ऑनलाईन पद्धतीने पार पडले . कार्यक्रमाची सुरवात डॉ.संजय फुंदे (मेडिकल ऑफिसर ऑफ हेल्थ,बी एम सी) ह्यांच्या हस्ते दीपप्रज्वलाने झाली. संमेलनाध्यक्षा सौ.माधुरी चौधरी लेखिका - कवयित्री,संभाजीनगर )ह्यांनी दिव्यांग मुलांना मार्गदर्शन केले.दिव्यांगांच्या लेखन प्रतिभेला जगासमोर आणण्यासाठी ,लिहत्या हातांना बळ देण्यासाठी सदर संमेलनाचे आयोजन केले गेले असे साहित्यसंपदा संस्थापक श्री.वैभव धनावडे ह्यांनी सांगितले.काव्यवाचन सत्र, अभिवाचन ,परिसंवाद अशी सत्रे पार पडली .साहित्याच्या माध्यमातून दिव्यांगांचा आत्मविश्वास वाढीस लागेल असे मत स्वागताध्यक्षा सौ.अश्विनी बोलके ह्यांनी व्यक्त केले.प्रमुख निमंत्रित म्हणून संजय पाटील लेखक,कवी आणि राजश्री पाटील  (National Association for Blind) ह्यांनी मुलांचा आत्मविश्वास वाढविला.दिव्यांगांसाठी विशेष काम करणाऱ्या We Assist संस्थापिका मीना सप्रे ,आदिती फडणीस यांनी संस्थेच्या कार्याबद्दल आढावा दिला.

विकास कासारे (बुलढाणा), देवेन सोनार(पालघर), सुप्रिया यादव(पुणे), नवनाथ बारबिंडे,(पुणे) यांनी आपल्या कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली तर वेदिका फडके (कोल्हापूर) ह्यांनी अभिवाचन केले. संमेलनात 'साहित्यातून सकारात्मक जीवन' या विषयावर परिसंवाद पार पडला. परिसंवादा संवादक म्हणून सौ.कल्पना देशमुख ह्यांनी काम पहिले. लेखिका संगीत थोरात (नागपूर), विलास वाव्हळ (माध्यमिक विद्यालय विवेकानंद संकुल सानपाडा मुख्याध्यापक) ह्यांनी सहभाग नोंदविला. कार्यवाहक म्हणून श्री.मंजुळ चौधरी,सौ.सुप्रिया जोशी आणि श्री.किसन पेडणेकर ह्यांनी काम पाहिले.

 

Previous Post Next Post