Home

सार आनंदाचे.... कवयित्री वर्षा शिदोरे

 सार आनंदाचे…


हुंदक्यांच्या थापल्या कित्येक भाकरी

करपली मोजक्याच सुखांची रानभाजी 

दुःखांची न्याहारी जरा कडवट लागली 

असह्य वेदना मात्र काळजीवाहू झाली 

आठवणींची गाठ उगाच मनाशी बांधली 

मनधरणी करण्या हाक कुणा नाही आली

परिस्थिती अशी आनंदाची थट्टा पाही…


मग वाटे उगा सारे दावे होते खोटेनाटे 

पाहिले असते पारखून स्वतःत थोडे

तर नसते अडले कुणावाचून फारसे 

डाव अंताचे ठरलेले असतात काहीसे

जड अंतःकर्णाचे अपघाती असे ओझे 

मनाचे बोल बांधतात पहाड भलेमोठे 

सार आनंदाचे जगण्यात खरे जीवनाचे…


© वर्षा_शिदोरे

नाशिक 

मो. ८७९३७९९७७७

Previous Post Next Post