Home

पहिल्याच पावसात निसर्गाचा तडाखा; चौल-भोवाळेतील रस्ता वृक्षामुळे ठप्प

 पहिल्याच पावसात निसर्गाचा तडाखा; चौल-भोवाळेतील रस्ता वृक्षामुळे ठप्प

शाळकरी विद्यार्थ्यांसह नागरिकांची गैरसोय; युवकांनी तातडीने मार्ग केला मोकळा


अलिबाग (ओमकार नागावकर) 

हवामान विभागाने दिलेल्या येलो अलर्टचा पहिला फटका अलिबाग तालुक्यातील चौल-भोवाळे परिसराला बसला. मंगळवारी (दि. २४ जून) सकाळी सुमारे ६ वाजण्याच्या दरम्यान रस्त्यालगत असलेला भला मोठा आकाशी वृक्ष अचानक कोसळल्याने वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली.

या घटनेमुळे सकाळच्या वेळेत शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांची मोठी गैरसोय झाली. रस्त्यावर वृक्ष आडवा पडल्याने वाहनांची रांग लागली होती. मात्र, परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्थानिक युवकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.

भोवाळे येथील अभय फुंडे, किशोर ठाकूर, जयवंत घरत, आर्यन मिसाळ, अजिंक्य मिसाळ आणि निखिल खारकर यांनी एकत्रितपणे वृक्षाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा केला. त्यांच्या तत्परतेमुळे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आणि पुढील अनर्थ टळला.

युवकांच्या या सामाजिक बांधिलकीचे परिसरातून कौतुक होत असून, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Previous Post Next Post