Home

आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा : अलिबाग जिल्हा कारागृहात योग सत्राचे आयोजन

 आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा : अलिबाग जिल्हा कारागृहात योग सत्राचे आयोजन


अलिबाग(वार्ताहर)


दि. २१ जून २०२६ रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अलिबाग जिल्हा कारागृह येथे "उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्था व माणुसकी प्रतिष्ठान - अलिबाग" यांच्या वतीने विशेष योग सत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला कारागृहातील बंदी बांधवांचा व महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या योग सत्रासाठी उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती उज्ज्वला चंदनशिव-चव्हाण यांनी प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन केले.समन्वयक श्रीम. ममता म्हात्रे, श्रीम. उत्कर्षा गुरव या ही उपस्थित होत्या.त्यांनी विविध योगासने, प्राणायाम व ध्यानाच्या माध्यमातून योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व समजावून सांगितले.योगामुळे मानसिक तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि सकारात्मक विचारांची जडणघडण होते. बंदी बांधवांनी मोठ्या उत्साहाने योगाभ्यास करत निरोगी व तणावमुक्त जीवन जगण्याचा संकल्प केला.यावेळी श्रीमती उज्ज्वला चंदनशिव-चव्हाण यांनी योग हा केवळ व्यायाम नसून जीवन जगण्याची एक सकारात्मक पद्धत असल्याचे सांगितले. समाजाच्या मुख्य प्रवाहात पुन्हा सकारात्मकतेने सहभागी होण्यासाठी योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असेही त्यांनी नमूद केले.या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अलिबाग जिल्हा कारागृह प्रशासनाने सहकार्य केले. त्याबद्दल संस्थेच्या वतीने प्रशासनाचे आभार व्यक्त करण्यात आले.योग म्हणजे शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारा सुंदर सेतू आहे." या संदेशासह आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

Previous Post Next Post