मोदक स्पर्धा म्हणजे मनातील आनंद ईश्वरापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग:रायगड भूषण प्राध्यापक एल. बी. पाटील.
अलिबाग (प्रतिनिधी)
उरण तालुक्यातील वशेणी येथे जनसेवेतून आनंद देणाऱ्या वशेणी इतिहास संपादकीय मंडळातर्फे नुकताच मोदक स्पर्धा संपन्न झाल्या. अंगारकी संकष्टी निमित्त आयोजित केलेल्या या मोदक स्पर्धेत परिसरातील महिला भगिनींनी सहभाग घेऊ मोदक स्पर्धेचा आनंद द्विगुणित केला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते गणरायाची महाआरती घेण्यात आली. यावेळी रायगड भूषण प्राध्यापक एल बी पाटील सरांनी इतिहास संपादकीय मंडळाचे कौतुक केले. हे कौतुक करत असताना वशेणी इतिहास संपादिकीय मंडळ आयोजित मोदक स्पर्धा म्हणजे महिला भगिनींच्या मनातील आनंद ईश्वरापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहे असे गौरव उद्धार यावेळी काढले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अनंता माळी, क्रीडाप्रेमी शिक्षक सनी बोरसे, कोमसाप उरण शाखेचे बाल विभाग प्रमुख श्री संजीव पाटील, डॉक्टर रवींद्र गावंड, पत्रकार अजय शिवकर, सौ अनिता शिवकर,श्री संदेश गावंड,श्री. बी.जे .म्हात्रे, श्री अनंता तांडेल, श्री गणपत ठाकूर, श्री पुरुषोत्तम पाटील, श्री अनंता पाटील,श्री.विश्वास म्हात्रे, श्री किशोर म्हात्रे, श्री गणेश खोत, वशेणी गावचे पोलीस पाटील श्री दीपक म्हात्रे, श्री बळीराम म्हात्रे, श्री .जे.डी.पेंटर, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी वशेणी गावचे सुपुत्र कुमार स्मीत सुधीर पाटील यांची अंडर 19 क्रिकेट रायगड टीम मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह,स्नेहवस्र आणि भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
गणरायाला आवडणारे 21 मोदकांचे औचित्य साधून या स्पर्धेत नियोजित 21 महिला भगिनींनी विविध रंगाचे ,आकाराचे, नक्षींचे त्याचप्रमाणे पौष्टिक आणि चवदार असे आडवे ,उभे मोदक बनवले होते. या स्पर्धेचे परीक्षण करण्याचे काम पाककला निपुण श्री रवींद्र पाटील, श्रीमती समता ठाकूर, सौ विजया भगत, सौ शितल अनंत माळी आणि श्री संजीव पाटील यांनी उत्तमरीत्या केले.
सर्व सहभागी स्पर्धकांना मंडळा कडून भेटवस्तू देण्यात आली.
या स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
उत्तेजनार्थ क्रमांक
सौ अक्षता महेश पाटील ,
सौ सुवर्ण शेखर म्हात्रे ,
सौ .सुचिता सुरज ठाकूर
तृतीय क्रमांक - सौ. रुपाली राजेश पाटील
द्वितीय क्रमांक सौ निकिता सनीम पाटील
प्रथम क्रमांक अश्विनी तुषार ठाकूर
यावेळी क्रीडाप्रेमी शिक्षक श्री सनी बोरसे यांच्या सौजन्याने प्रथम क्रमांक विजेत्या सौ अश्विनी तुषार ठाकूर यांना *पैठणी साडी* देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.मच्छिंद्र म्हात्रे यांनी केले.

