प्रेमाचा सोहळा
एक सूर बासरीचा
ऋतू हिरवा कोवळा
राधा अबोल बावरी
करी मौनाचा सोहळा
एक गंध मोगऱ्याचा
चांदण्यांनी भिजलेला
कृष्णाच्या वेणूवरीचा
स्वर प्रेमाने नटलेला
एक डोह नयनीचा
कृष्णावर रोखलेला
ओठांवरी हसू तिच्या
गुपित गाणं सजलेला
एक स्पर्श वाऱ्याचा
यमुनातीरी खेळलेला
राधा–कृष्ण मिलनाचा
क्षण अनंत उजळलेला
एक क्षण मिलनाचा
पौर्णिमेला बहरलेला
दोघांच्या जीवनात
आनंद उधळणारा
सौ. भावना देवेंद्र नेमाडे
कल्याण