Home

मुक्तेची आर्त हाक... कवयित्री शरयू निंबाळकर


 मुक्तेची आर्त हाक


माझ्या भावा रे ज्ञानोबा,सुखे झाली रे

बोथटी /

अश्रु दाटती डोळ्यात,धरी मुक्तेला या पोटी //


हात धरुनी मुक्तेचा,खेळ ज्ञानियाचा

 खेळी/

तुजविण या प्रेमाची,रिती झाली आज झोळी //


तूच होतास रे धीर,माय-बाप माझे

ठाई /

अश्रु पुसोनी म्हणसी, मुक्ते रडु नको 

बाई //


विश्व कल्याणाचा खेळ,खेळे ज्ञानियाची ओवी /

कधी येसी रे ज्ञानोबा,माझे अंतरीचे

गेही//


आज आळंदीचा तट,रडे तुजला

स्मरोनी /

छोटी मुक्ता आज झाली,ज्ञाना वाचुन पोरकी //


झाला सर्वां ठाई देव,झेप घेऊनी

आकाशी/

दादा आसुसली मुक्ता,प्राण दाटले

कंठासी //


भावा माझ्या रे ज्ञानोबा,तूच  श्वास माझे देही/

येई हात माझा धर,मुक्ता झाली रे

पोरकी//


देई कोण मला धीर, कोण आसवे

पुसती/

तुजविण रिते जग,का रे घेतली

समाधी //


कशी थांबवू मी आता,ओढ माझ्या अंतरीची/ 

सान बहीणही तुझी, तुझ्या वाचुनी

रडती//


अरे ज्ञानियांचा राजा, ऐक माझी

विनवणी/

ठेव मुक्तेला रे दादा, नित्य तुझ्याच

चरणी//


शरयू निंबाळकर

(पुणे)

Previous Post Next Post