Home

भारत पाकिस्तान यांच्यात आशिया कपसाठी आज महामुकाबला; नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय


भारत पाकिस्तान यांच्यात आशिया कपसाठी आज महामुकाबला; नाणेफेक जिंकून भारताचा गोलंदाजीचा निर्णय

दुबई

आशिया कप 2025 स्पर्धेतील अंतिम सामन्यात ट्रॉफी जिंकण्यासाठी भारत विरुद्ध पाकिस्तान हे 2 शेजारी आणि कडवट प्रतिस्पर्धी आमनेसामने आहेत. दोन्ही संघांची आशिया कप स्पर्धेच्या 41 वर्षांत अंतिम फेरीत आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. हा ब्लॉकबस्टर सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. 

सामन्याची चाहत्यांना गेल्या अनेक तासांपासून प्रतिक्षा लागून आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी साडे सात वाजता टॉस उडवण्यात आला. टीम इंडियाच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव याने फिल्डिंगचा निर्णय घेत पाकिस्तानला बॅटिंगसाठी भाग पाडलं आहे. टीम इंडियाला अंतिम सामन्यात मोठा झटका लागला आहे. टीम इंडियाचा मॅचविनर खेळाडू हार्दिक पंड्या याला दुखापतीमुळे अंतिम सामन्याला मुकावं लागलं आहे, याबाबतची माहिती कर्णधार सूर्यकुमार याने नाणेफेकीनंतर दिली. भारतीय संघात एकूण 3 बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे या दोघांचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे हर्षित राणा आणि अर्शदीप सिंह या दोघांना बाहेर व्हावं लागलं आहे. तर हार्दिकच्या जागी स्टार फिनिशर रिंकु सिंह याला संधी दिली आहे. तर पाकिस्तानने प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.


Previous Post Next Post