Home

राजकारणात एकमेकाच्या विरोधात असणारे नेतेमंडळी मात्र जुगार अड्ड्यावर एकत्र :सतरा जणांविरोधात खोपोली पोलिसांनी केली कारवाई


 


राजकारणात एकमेकाच्या विरोधात असणारे नेतेमंडळी मात्र जुगार अड्ड्यावर एकत्र 

सतरा जणांविरोधात  खोपोली पोलिसांनी केली कारवाई 


रायगड - अमुलकुमार जैन 

  रायगड जिल्ह्यातील राजकारण मध्ये एक मेकाच्या विरोधात दंड थोपटून कायम उभे असणारे नेते मंडळी मात्र त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात एकत्र राहत असतात. खालापूर तालुक्यातील मौजे काटरंग येथील तुषार पद्माकर अहिर यांच्या बंगल्यात बेकायदेशीर रित्या तीन पत्ती जुगार खेळत असताना खोपोली पोलिसांनी छापा टाकत सतरा जणांविरोधात कारवाई करीत त्यांच्याकडून चार लाख छत्तीस हजार सहाशे सत्तर रुपये सहित काही पत्ते जप्त केले आहेत.

  खालापूर तालुक्यातील प्रमुख राजकीय पक्ष एकमेका विरुद्ध दंड थोपटून उभे  असल्याचे वरवर दिसत असले तरी प्रत्यक्षात मात्र जुगार अड्ड्यावर पडलेला धाडीत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून जुगार खेळणारे विविध राजकीय पक्षातील  सतरा जण पोलिसांच्या जाळ्यात सापडले आहेत. खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे यांना गुप्त बातमीदारा तर्फे शहरातील काटरंग भागात बंगल्यात मोठा जुगाराचा डाव रंगाची माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे  पहाटे साडेतीन वाजता पोलीस निरीक्षक सचिन हिरे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत व्हरांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे ,पोलीस हवालदार संतोष रुपनवर, पोलीस शिपाई राठोड यांच्यासह पथकाने तुषार अहिर यांच्या बंगल्यावर छापा टाकला.  यावेळी पैसे लावून तीन पत्ती जुगार खेळताना 

तुषार पद्माकर अहिर(वय-४३ वर्षे, रा. घर नं.१/३/९, काटरंग चर्च जवळ काटरंग, खोपोली, ता.खालापुर), अजय कृष्णा सोनावणे(वय-४१ वर्षे,रा.वैभव-३ रेसिडेन्सी, रुम नं.१२, काटरंग रोड, खोपोली, ता. खालापुर), संतोष वसंत सूर्यवंशी(वय-४४ वर्षे, रा. बुरुड चाळ, वरची खोपोली, ता. खालापुर, जि.रायगड),भालचंद्र जनार्दन कदम(वय-३४ वर्षे, रा. खरवई, ता.खालापुर, जि. रायगड)दत्ता भिवा बावधने, (वय-३६ वर्षे, रा.डॉक्टर वजे चाळ, रूम नं. १६२, वरची

खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड),उमेश नरेश ओव्हाळ, (वय-३५ वर्षे, रा. भानवज बौध्दवाडा, खोपोली,ता. खालापुर, जि. रायगड) ,रुपेश बचन वाघमारे, वय-३४ वर्षे, रा. भानवज बौध्यवाडा, खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड),महेश विठ्ठल कर्णक(वय-३७ वर्षे, रा. सारसण, खोपोली, ता.खालापुर, जि. रायगड), प्रशांत थोडीबा साळुंके(वय-४४ वर्षे, रा.शेबडी, ता. खालापुर, जि. रायगड),

 स्वप्नील पुरुमल चौधरी(वय-३७वर्षे, रा.सारसण, खोपोली, ता. खालापुर),जि.रायगड),प्रदिप रमेश कर्णक(वय-२९ वर्षे, रा.सारसण, खोपोली, ता. खालापुर, जि. रायगड) ,सुजाण गोपाल डेबनाथ, (वय-२८ वर्ष, ग.भानवज बौध्दवाडा, खोपोली)अमोल लक्ष्मण जाधव(वय-३२ वर्षे, रा.सारसण, खोपोली, ता.खालापुर, जि. रायगड),अविनाश सदानंद

कदम(वय-५० वर्षे, रा.जांभिवली, पाचोशी, ता. खालापुर, जि. रायगड),नथी बाधुशाह शेख(वय वर्षे, रा. चिण्मयनगर, क्रिसीडहिल बिल्डींग स्म नं.१, खोपोली, ता. खालापुर),राजेश सखाराम पार्ट, वय-४५ वर्षे, रा. विरेश्वर सोसायटी, चिल्डींग नं.२, वरची खोपोली, ता.खालापूर),अल्पेश अनंत बस्कुडे(वय-३५ वर्षे, रा.मीजी, ता.खालापुर, जि. रायगड) रंगेहाथ सापडले. याबाबतची फिर्याद खोपोली पोलीस ठाण्यात संतोष जनार्दन रुपनवर, वय-४४ वर्षे, पोहवा/१०७२, खोपोली पोलीस ठाणे, जि. रायगड) यांनी दिली आहे.

 पोलीसांनी सर्वाना ताब्यात घेत जुगारात लावण्यात आलेली चार लाख छत्तीस हजार सहाशे सत्तर रुपये सहित काही पत्ते जप्त जप्त केली.

या कारवाईत १२००/- रुपये अजय कृष्णा सोनावणे याच्या ताब्यात,६००/- रुपये संतोष वसंत सुर्यवंशी याच्या ताब्यात, ९००/- रुपये भालचंद्र जनार्दन कदम याच्या ताब्यात, ८७०/- रुपये तुषार पद्माकर अहिर याच्या ताब्यात, ७००/यारुपये दत्ता भिया बावधने याच्या ताब्यात,६००/- रुपये उमेश नरेश ओव्हाळ याच्या ताब्यात,८००/- रुपये रुपेश चचन वाघमारे ,२२००/- रुपये महेश विठ्ठल कर्णफक याच्या ताब्यात,२४००/- रुपये प्रशांत पोडीबा साळुंके याच्या ताब्यात, ७००/- रुपये स्वप्नील पुरुमल चौधरी याच्या ताब्यात, ७००/- रुपये प्रदिप रमेश कर्णक याच्या ताब्यात,८००/- रुपये सुजाण गोपाल देबनाथ याच्या ताब्यात,१३००/- रुपये अमोल लक्ष्मण जाधव याच्या ताब्यात, २८००/- रुपये अविनाश सदानंद कदम याच्या ताब्यात,६००/- रुपये नची बाचशाह याच्या ताब्यात,१००००/- रूपये राजेश सखाराम पाटे याच्या ताब्यात,३२००/- रुपये अल्पेश अनंत थरफड याच्या ताब्यात,३,१८,०००/- ५०० रुपये किमतीच्या ७९६ चलनी नोटा, २२००/- २०० रुपये किमतीच्या ११ चलनी नोटा,१२,६००/- १०० रुपये किंमतीच्या १२६ चलनी नोटा.,६००/- रुपये किमतीचे काव्या रंगाचे तीन बॉक्स ,१००/- रुपये किमतीच्या ९ प्लास्टीकच्या खुच्र्या

 १०००/- रुपये किमीतीचे २३ लांबी-रुंदीचे से रंगाचे दोन आयाताकृती प्लास्टीकचे टेबल,१००/- रुपये किमतीची बेडशीट असा एकूण  ४,३६,६७०/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  खोपोली पोलीस ठाण्यात गुन्हा रजि.नं गन्हा रजि.नं. २३१/२०२५ महाराष्ट्र जगार प्रतिबंध अधिनियम १८८७चे कलम ४,५, प्रमाणे दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस निरीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अभिजीत व्हरांबळे हे करीत आहेत.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक आचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे,खालापूर उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल  यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

 रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी कारवाईचा धडाका चालवला असून काही दिवसापूर्वी वावंढळ येथील जुगार अड्ड्यावर छाप्यात दोन शिक्षक आणि इतर नऊ जण सापडले होते . आता खोपोलीतील कारवाई बडी राजकीय धेंडे सापडल्याने सर्वत्र कारवाईचे स्वागत होत आहे.

Previous Post Next Post