Home

हुजूरपागा शाळेत कविता कार्यशाळा


 हुजूरपागा शाळेत कविता कार्यशाळा


पुणे (वार्ताहर)

वसुधा फाऊंडेशन, पुणे यांच्या उपक्रम क्रमांक ०७ अंतर्गत हुजूरपागा मुलींची इंग्लिश मिडीयम शाळा, मांगडेवाडी येथे इयत्ता १ ली ते ५ वीच्या विद्यार्थ्यांसाठी कविता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.तसेच लेखिका वसुधा नाईक यांचा 'रमाची पाटी'  हा लघुचित्रपट दाखवण्यात आला. 

या कार्यशाळेस मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध बालसाहित्यिक सौ. वसुधा नाईक यांनी मुलांना कवितालेखनाची दिशा दिली.त्याच  बरोबर बालसाहित्यिक योगेश हरणे ही उपस्थित होते. मुलींनी उत्साहाने या कार्यशाळेत सहभाग घेतला.

या कार्यक्रमामुळे लहान विद्यार्थ्यांमध्ये कवितेची आवड निर्माण होऊन त्यांची सर्जनशीलता अधिक वृद्धिंगत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. मुलींनी उत्साहाने कविता लेखनही केले.

या कार्यक्रमासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कीर्ती पंडित व पर्यवेक्षिका श्रीमती अर्पिता कुलकर्णी यांचे मार्गदर्शन मिळाले.

  

Previous Post Next Post