स्वप्नपुर्तीनिमित्ताने आ. महेंद्र दळवींचा तुळा सोहळा
अलिबाग, ता. २९: सर्वसामान्य जनतेचे नेते महेंद्र दळवी हे आमदार व्हावेत यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजाभाई केणी यांची सलग दुसऱ्यांदा स्वप्नपुर्ती झाली आहे. आ. महेंद्र दळवी विधानसभेवर बहुमताने निवडुन यावेत यासाठी राजाभाई केणी यांनी आई भवानीच्या चरणी प्रार्थना केली होती. या स्वप्नपुर्ती निमित्ताने आ. महेंद्र दळवी यांची हेमनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे मंगळवार (ता.३०) रोजी आयोजित केलेल्या कार्यक्रमात तुळा केली जाणार आहे.
शेतकरी कामगार पक्षाची सत्ता उलथवून लावून महेंद्र दळवी यांना सर्वप्रथम आमदार करण्यात राजाभाई केणी यांनी दिवसरात्र मेहनत घेतली होती. त्यांचा बहुमताने विजय व्हावा यासाठी सहा वर्षीपुर्ण केलेली प्रार्थना पुर्ण झाली होती. तेव्हाही त्यांनी स्वप्नपुर्ती सोहळा मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला होता. आ. महेंद्र दळवीचा पुन्हा बहुमताने विजय होण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख राजाभाई केणी, कुसुंबळे ग्रामपंचायतीच्या माजी उपसरपंच रसिकाताई केणी यांनी आई भवानीच्या चरणी प्रार्थना केली होती. या प्रार्थनेला यश आले असून आ. महेंद्र दळवी बहुमताने पुन्हा अलिबाग-मुरुड मतदार संघातून विजयी झाले. या निमित्ताने मंगळवार, (ता.३० सप्टेंबर) रोजी सायंकाळी ४.०० वाजता हेमनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे तुळा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या समारंभासाठी शिवसेना नेत्या मानसीताई दळवी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत, त्याचबरोबर भाजपा जिल्हा सरचिटणीस महेश मोहिते, शिवसेना नेते दिलीप (छोटमशेठ) भोईर, कामगार नेते दिपक रानवडे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शैलेश पाटील, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख संजीवनी नाईक, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रथमेश पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख अनंत गोंधळी, शिवसेना मुरुड तालुकाप्रमुख निलेश घाटवल, शिवसेना महिला तालुका प्रमुख भाग्यता पाटील, युवासेना अलिबाग तालुका प्रमुख संदेश थळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा सोहळा शिवनेरी नवरात्र उत्सव मंडळ हेमनगर, नवीन वाघवीरा, तळेश्वरवाडी यांनी आयोजित केला आहे.