'म' मराठीचा
'म' मराठीचा मुलांनो
गिरवू पाटीवर सर्व
मराठी शाळा,भाषेचा
आहे आपणास गर्व.
'छ' छत्रपती शिवाजींचा
जाणूया सारे इतिहास
आनंददायी शिक्षणाने
भविष्य घडवू खास.
'स' साधूसंतांच्या 'श'
शूरवीरांच्या ऐकू गाथा
मूल्यशिक्षणाचे धडे
घेऊन उजळू माथा.
'क' कविता गाऊ,करू
थोरामोठयांचा सन्मान
भूतदया अंगी बाणून
ठेवू मानवतेची जाण.
बाळांनो माय मराठीला
अभिजात दर्जा आज
माझी मराठी माती अन
मायबोलीचा सर्वत्र गाज.
अटकेपार झेंडा मराठीचा
ऐतिहासिक सुवर्णदिन
वारसा मराठीचा जपून
जोडू मराठी मनांची वीण.
सौ.सुजाता सोनवणे.
सिलवासा दादरा नगर हवेली.
.jpg)