Home

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून सुरुवात; १२ ऑगस्टपर्यंत चालणार अधिवेशन

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला २१ जुलैपासून सुरुवात; १२ ऑगस्टपर्यंत चालणार अधिवेशन

नवीदिल्ली

केंद्र सरकारने संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखांची अधिकृत घोषणा केली असून, हे अधिवेशन २१ जुलै २०२५ पासून सुरू होणार असून १२ ऑगस्ट २०२५ रोजी संपणार आहे. या बाबतची माहिती केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.

संसदीय कामकाज मंत्रिमंडळ समितीने संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनाच्या तारखांची शिफारस केली होती. त्यानंतर यावर अंतिम निर्णय घेण्यात आला, असे रिजिजू यांनी स्पष्ट केले. याआधी अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारी रोजी सुरू झाले होते आणि ४ एप्रिल २०२५ रोजी संपले होते. आता पावसाळी अधिवेशनात महत्त्वाचे विधेयक, चर्चासत्रे आणि राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दरम्यान, विरोधकांकडून ऑपरेशन सिंदूर या मुद्द्यावर चर्चा घडवून आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर आता पावसाळी अधिवेशनात सर्व मुद्द्यांवर चर्चा करता येईल, असे आश्वासन संसदीय कामकाज मंत्री रिजिजू यांनी दिले.


Previous Post Next Post