Home

अलिबागमध्ये शिवसेनेच्या वर्धापनदिनी मशाल धगधगली


 अलिबागमध्ये शिवसेनेच्या वर्धापनदिनी मशाल धगधगली


शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात


अलिबाग (ओमकार नागावकर)

मराठी माणसाच्या अस्मितेसाठी उभ्या राहिलेल्या शिवसेना या जाज्वल्य चळवळीच्या ५९ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नव्या संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन अलिबागमध्ये करण्यात आले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या समोर उभारण्यात आलेल्या या कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे आणि संपर्कप्रमुख प्रसाद भोईर यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले.

यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह दिसून आला. "८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण" या बाळासाहेबांच्या तत्वज्ञानाचे प्रतिध्वनीत करणारे हे कार्यालय जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी केंद्रबिंदू ठरणार आहे.उद्घाटनप्रसंगी जिल्हा संघटिका दीपश्री पोटफोडे, युवासेना अधिकारी अमीर ठाकूर, विधानसभा संपर्कप्रमुख अजय गोयजी, उपतालुका प्रमुख, महिला आघाडी, शाखाप्रमुख, तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करत मराठी समाजाच्या हितासाठी अधिक कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

शिवसेनेच्या स्थापनेपासूनच राज्यातील भूमिपुत्रांना स्वाभिमानाने जगण्यासाठी बळ देण्याचे काम बाळासाहेब ठाकरे यांनी केले. त्यांच्या ज्वलंत विचारातून साकारलेल्या या चळवळीचे आजही मार्गदर्शन मिळत असून, शिवसेना (उ.बा.ठा) पक्ष त्याच विचारधारेवर चालत जनतेच्या हक्कांसाठी लढा देत आहे.वर्धापन दिनानिमित्त जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे व प्रसाद भोईर यांनी सर्व शिवसैनिकांना शुभेच्छा दिल्या व "मराठी माणसाचा आत्मसन्मान हा शिवसेनेचा आत्मा आहे," असा संदेश दिला.

Previous Post Next Post