Home

नात्यातील एकांत... लेखिका संगीता बांबोळे


 नात्यातील एकांत

   

     प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात नात्याला फार महत्त्व असते.मग ते नाते मैत्रीचे असो वा पती पत्नीचे किंवा अन्य कुठलेही.प्रेम ,विश्वास, जिव्हाळा अशा प्रत्येक परिस्थितीत एकमेकांसोबत राहण्यासाठी दोन व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती एकत्र येतात तेव्हा आयुष्य जगण्यात खरा आनंद असतो.तेव्हाच आपल्याला कित्येक आव्हाहनांना समोर जाण्याचे बळ अंगात येत असते.पण कधी कधी काही गोड गैरसमज होऊन अशी सुंदर नाती दुरावली जातात तेव्हा मात्र आपणं फार एकटे पडतो,खचून जातो.जी अपेक्षा आपणं नात्यांकडून करतो ती अपेक्षा पुर्ण होत नाही आणि मग नात्यातील संवाद संपतो व एकट्याने जीवन जगावं लागतं.

       एकटेपणा हा सांगून येत नसतो तर तो परिस्थितीनुसार आपल्या वाट्याला आलेला असतो त्यामधून जर बाहेर पडायचं असेल तर मग परिस्थितीशी झगडून स्वतः माघार घेऊन तो पूर्वस्थितीत आणावा लागतो. आजच्या युगात नाती जोडण्यापेक्षा नाती टिकवने फार कठीण झाले आहे.प्रत्येकांना याची जाणीव होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मानवी जीवनात  नात्यातील सर्वात महत्त्वाचे नातं असेल तर ते पती पत्नीचे हेच नातं आयुष्यभर सोबत असते.पण काही ठिकाणी आपणं बघतो की या नात्यायामध्ये फक्त एकमर्जीने काम चालत असते. निर्णय किंवा निवड स्वातंत्र्य  फक्त एकालाच असते.तर दुसऱ्या व्यक्तीच्या अस्तित्वाची जाणीवच नसते.त्यामुळे मग ती व्यक्ती फार एकाकी पडते.अशा नात्यातील गोडवा संपून फक्त कळवटपणा निर्माण झालेला असतो. अशावेळेस नौराश्य वाट्याला येऊन आरोग्य तक्रारी जाणून लागतात.नाते एकत्र राहून चालत नाही तर त्यांच्या मनातील तारा एकमेकांशी जूडायला हव्यात. त्यासाठी माघार घेणे हा एकच उपाय असतो. आणि त्यामुळेच  आपल्याला कुणी समजून घेईल या भ्रमात न राहता अंधारातून उजेडाकडे जाण्याचा मार्ग स्वतःला  शोधावा लागतो. कारण एकांत हा दिर्घकाळ असला तर तो मानसिक संतुलन बिघडून कधी जीवघेणा पण होऊ शकतो.

    निसर्गाने मानवाची निर्मितीच तशी केली कि तो कळपात राहणारा प्राणी आहे. आपले सुख,दुःख वाटून घेत एकमेकांच्या सहवासात तो जगत असतो.अनेक नाते असेही आहेत की ते फक्त समाजबंधनातून जगण्याची सकारात्मक भुमिका पार पाडत असतात.त्याच दृष्टिकोनातून त्यांना आत्मपरीक्षण करून स्वतःला घडवता येतो. एकांत आणि एकटेपणा भौतिक दृष्टीने बघीतलं तर दोन्ही बाजू सारख्याच आहेत.फरक फक्त आपल्या मानसिकतेचा आहे. आपले जवळचे असूनही ते आपले नसतात अशावेळ या  नात्यांचा गर्दीतही आपल्याला एकटेपणा खात असतो.

  आज विज्ञानाच्या युगात आभासी नात्यांनी डोकं वर काढलं आहे.प्रत्येक सेकंदाला, मिनिटीला,तासाला मँसेज किंवा फोनवरील संवादातून नाती जोडली जातात आणि हा प्रत्येकांचा अनुभव आहे. या नात्यांना साखरेसारखी गोडी असते पण ते काही काळातच विरघडून जातात.अशी नाती काही कामापुरतच जवळ येतात. आजच्या या जीवघेण्या युगात पाठीवरून हात फिरविणारे मायेने आपुलकी जवळ करणारी नाती मात्र दुर्मिळच झाली आहेत.पुर्वीच्या काळाचा जर विचार केला तर,हीच नाती फार घट्ट असायची.सणवार, लग्न,अन्य समारंभात नातेवाईकांची रेलचेल असायची.आठ पंधरा दिवस राहून घराचे आनंदवन करून जायचे. त्यावेळी नात्यात दुरावा तर नाहीच पण कधी एकटेपणाचा लवलेशही जाणवत नव्हता.पण आता सगळं चित्र उलट झालयं.

   एकटेपणा माणसाला कमकुवत बनवत जातो,अनेक मेलेल्या जखमांवर अधिक मलमपट्टी करण्याच कामं करतो.तर कधी एकांत माणसाला भविष्य घडविण्यासाठी नवीन संधी शोधून देतो.आपल्या हातात आज जे आहे त्यावर विचार करून समोर जाण्यासाठी धडपडणारा माणूस मागे गेलेल्या चुकांचा मागे धावत आहे. एकटेपणात हार न माणता पुस्तकाची मैत्री करा.स्वतःत लिखानाची आवड निर्माण करा,ह्मदयाशी नाती जोडा कधी कधी अहंकार सोडून नम्र होऊन बघा.एकटेपणा जवळही फिरकणार नाही..


संगीता बोरकर-बांबोळे गोंडपिपरी, चंद्रपूर 9405718463

Previous Post Next Post