दक्षिण आफ्रिकेने वल्ड टेस्ट चँम्पीयनशीप स्पर्धेचे पटकावले विजेतेपद; विजयासह रचला इतिहास; बलाढ्य ऑस्ट्रेलियाला चारली धुळ; मार्करम ठरला मॅचविनर
लंडन
चोकर्स म्हणून ज्यांनी आयुष्यभर शिक्का झेलला त्याच दक्षिण आफ्रिकेने WTC Final 2025 जिंकत इतिहास रचला आहे. बलाढ्या ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेने धुळ चारली आणि जेतेपदाला गवसणी घातली. एडन मार्कम यावेळी दक्षिण आफ्रिकेसाठी तारणहार ठरला. ऑस्ट्रेलियाला तो एकटा भिडला आणि देशाला पहिले वहिले विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेचे जेतेपद जिंकवून दिले. मार्करमने यावेळी १३६ धावांची अविस्मरणीय खेळी साकारली आणि संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. संघाला विजयासाठी फक्त सहा धावा हव्या असताना तो बाद झाला. पण दक्षिण आफ्रिकेने यावेळी ऑस्ट्रेलियावर पाच विकेट्स राखत सहजपणे मात केली आणि ते जग्गजेते ठरले.
ऑस्ट्रेलियाने दमदार फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेपुढे २८२ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग दक्षिण आफ्रिका करणार की नाही, ही शंका सर्वांच्या मनात होती. कारण आतापर्यंत त्यांनी बऱ्याचदा ऐनवेळी कच खाल्ली होती. पण आपल्यावर लागलेला चोकर्स हा शिक्का एडन मार्कमच्या शतकाने पुसून टाकला. सामन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी मार्करम बलाढ्य शिलेदारासारखा ऑस्ट्रेलियाच्या विजयाता मार्गात ठामपणे उभा राहीला आणि अभेद्य फलंदाजी करत त्याने जेतेपदाच्या किल्ल्यावर आपल्या देशाचा झेंडा फडकवला. मार्करमला कर्णधार तेंदा बवुमा चांगली साथ देत होता. पण त्याला अखेरपर्यंत मार्करमला साथ देता आली नाही.
बवुमाने यावेळी पाच चौकारांच्या जोरावर ६६ धावांची खेळी साकारली. पण त्याला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने बाद केले. सामन्याच्या चौथ्या दिवशी शतकवीर एडन मार्करम आणि तेम्बा बवुमा यांनी तिसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला ऑस्ट्रेलियाविरुद्धची जागतिक कसोटी क्रिकेट विजेतेपदाची लढत जिंकता आली. मार्करमने विआन मुल्दरसह ६१ आणि बवुमासह १४३ धावांची नाबाद भागीदारी केल्यामुळे दक्षिण आफ्रिकेने तिसऱ्या दिवशी वर्चस्व घेतले. मार्करमने नाबाद शतक आणि बवुमाने नाबाद अर्धशतक करीत दक्षिण आफ्रिकेला विजयपथावर नेले होते. पण त्याला संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब करता आले नाही. पण मार्करमने मात्र किल्ला लढवला आणि संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला.