Home

शेतीसाठी AI धोरण मंजूर; आणीबाणीत कारावास भोगलेल्यांचं मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय


शेतीसाठी AI धोरण मंजूर; आणीबाणीत कारावास भोगलेल्यांचं मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत १० मोठे निर्णय

मुंबई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज संपन्न झाली. या बैठकीत 10 मोठे निर्णय घेण्यात आले असून राज्यात शेतीसाठी AI धोरणास मंजुरी देण्यात आली आहे. यासह, आणीबाणीच्या काळात तुरुंगवास भोगलेल्या नागरिकांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरण 2025 ते 2029 मंजूर करण्यात आलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून कृषि क्षेत्रात परिवर्तन घडविता येणार आहे. त्यामुळे, मंत्रिमंडळ बैठकीतील हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरेल. यासह, धारावी पुनर्विकास, अनिवासी भारतीयांच्या मुलांच्या शिक्षणाबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विशेष हेतू कंपनी आणि अन्य यंत्रणा दरम्यानच्या भाडेपट्टा करारावरील मुद्रांक शुल्क माफ. लोकहितार्थ मोठा प्रकल्प असल्याने, पुनवर्सन व पुनर्विकास योजनेला गती लाभणार. योजनेची अंमलबजावणी सुलभ रीतीने होणार, कृषि- कृत्रिम बुद्धिमत्ता महाॲग्री-एआय धोरण २०२५-२०२९ मंजूर. कृषि क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा वापर करून परिवर्तन घडविता येणार. कृत्रिम बुद्धीमत्ता, निर्मितीक्षम कृत्रिम बुद्धीमत्ता, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ड्रोन, संगणकीय दृष्टीक्षमता, रोबोटिक्स, पूर्वानुमान विश्लेषण यांचा वापर करत, राज्यातील ॲग्रीस्टॅक, महा-ॲग्रीस्टेक, महावेद, क्रॉपसॅप, ॲगमार्कनेट, डिजिटल शेतीशाळा, महा-डिबीटी यांसारखे प्रकल्प पुढे नेण्यास मदत होणार

मुंबई मेट्रो मार्ग-२अ, २ ब आणि ७ या मेट्रो प्रकल्पांकरिता एशियन डेव्हलपमेंट बँक व न्यू डेव्हलपमेंट बँक यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या कर्जास मुदतवाढ, आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पटीने वाढ.  हयात जोडीदारालाही मानधन मिळणार. गौरव योजनेमध्ये सुधारणा. (सामान्य प्रशासन विभाग). केंद्र सरकारच्या WINDS प्रकल्पाअंतर्गत ग्रामपंचायत स्तरावर स्वयंचलित हवामान केंद्राची उभारणी करण्यात येणार. यासाठी महावेध प्रकल्पास मुदतवाढ देण्याचा निर्णय. राज्यातील सर्व गावांमध्ये हवामान विषयक अचूक माहिती मिळावी यासाठीचा प्रकल्प. शेतकऱ्यांना हवामानाधारित कृषि विषयक सल्ला व मार्गदर्शनासाठी महत्वाचा प्रकल्प. आदिंसह अन्य निर्णय बैठकीत घेण्यात आले. 


Previous Post Next Post