Home

अवकाळी पाऊस.... कवयित्री संगीता बांबोळे


 अवकाळी पाऊस


*कळत न कळत कसा*

*अवकाळी तू बरसतो*

*विजांच्या गडगडाटासह*

*थंड गारा सोबत आणतो..*


*तहानलेले पशू पक्षी, अन्*

*तप्त झाली होती धरती*

*तुझी चाहूल लागताच*

*आनंदाने ती झेप घेती..*


*तुझ्या आगमना आधी*

*साऱ्यांना तू हाक देतो*

*अबोल या वातावरणास*

*बोलकं करून तू जातो..*


*थंड होतात चहूदिशा

*ओसाळ रान फुलतो

*मन चींब चींब भीजून

*बेभान प्रेमगीत गातो...


संगीता बोरकर-बांबोळे

(गोंडपिपरी, चंद्रपूर)

Previous Post Next Post