माय मराठी प्रतिष्ठान पुणे या संस्थेचे सन २०२५ चे साहित्य पुरस्कार प्रदान
पुणे
माय मराठी प्रतिष्ठान पुणे यांचे साहित्य क्षेञातील अतिशय मानाचे साहित्य पुरस्कार आज दिनांक १६/५/२०२५ रोजी पञकार भवन पुणे येथे एका शानदार कार्यक्रमात साहित्यिकांना मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आले .यात कादंबरीसाठी तानाजी धरणे यांच्या " हेलपाटा " कादंबरीला सन्मानित करण्यात आले तर कथासंग्रहासाठी संजिवनी बोकील यांच्या " कवडशांचे फूल याला सन्मानित करण्यात आले तर काव्य विभागातुन कवी धनाजी घोरपडे यांच्या " जामिनावर सुटलेला काळा घोडा " या काव्यसंग्रहाला मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले .
या शानदार पुरस्कार वितरण कार्रक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ लेखिका संजिवनी बोकील यांनी भूषवले तर प्रमुख पाहुने म्हणुन श्री . मिलिंद जोशी कार्याध्यक्ष मसाप पुणे व अध्यक्ष अखिल भारतीय साहित्य महामंडळ हे होते . या कार्यक्रमासाठी प्रा .साईनाथ पाचारणे ज्येष्ठ साहित्यिक , श्री . सु.ल .खुटवड मुख्य उपसंचालक दै .सकाळ त्याचप्रमाणे संजय कमलेकर वनअधिकारी महाराष्ट्र शासन . सौ.प्रतिक्षा संतोष पाचारणे प्रथम लोकनियुक्त महिला सरपंच उपस्थित होते .सदर सुंदर कार्यक्रमाचे सुञसंचालन सौ .नयना पाचारणे व सौ.प्रज्ञा देशमुख यांनी अतिशय श्रवणीय केले . यावेळी अनेक साहित्यिक यांनी आपले विचार मांडले . माय मराठी प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा . श्री . सुभाष पाचारणे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावीक केले व सर्व मान्यवर व साहित्यिकांचे उपस्थितांचे आभार मानवे तर संयोजक श्री . बाळासाहेब खरात यांनी या गोड कार्यक्रमात अपस्थितांचे सुंदर आदरातिथ्य केले . या कार्यक्रमासाठी मोठ्याप्रमाणावर लेखक , कवि व
अनेक मान्यवर साहित्यिक हजर होते हेलपाटा कादंबरीला साहित्य क्षेञातील हा २० वा साहित्य पुरस्कार असल्यानं संघर्षमय हृदयस्पर्शी हेलपाटा कादंबरीचे सर्वञ कौतुक होत आहे ...!!! या पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी तानाजी धरणे व त्यांची पत्नी सौ . पुष्पा धरणे हजर होते .
