Home

भारतात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 7 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले; सुरक्षा दलाची मोठी कारवाई



भारतात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 7 दहशतवाद्यांना यमसदनी धाडले; सुरक्षा दलाची मोठी कारवाई

नवीदिल्ली(प्रतिनिधी)

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सध्या तणावाचे वातवरण आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑफरेशन सिंदूर राबवले. भारताने १०० पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव अधिक शिगेला पोहचला आहे. पाकिस्तानमधून जैश-ए-मोहम्मदच्या काही दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. सांबा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी भारताच्या हद्दीत प्रयत्न केला, त्यावेळी भारतीय जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भारताने सात दहशतवाद्यांचा खात्मा केल्याची माहिती समोर येत आहे. 

जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये रात्री ११ वाजता अंधाराचा फायदा घेत दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला. दहशतवाद्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला. बीएएसएफ आणि दहशतवाद्यांमध्ये चममक झाली. बीएसएफने दहशतवाद्यांना अद्दल घडवली. भारताने सात दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सांबा सेक्टरमध्ये रात्री ११ ते १२ वाजण्याच्या दरम्यान १० - १३ जैशच्या दहशतवाद्यांनी भारतात घुसण्याचा प्रयत्न केला होता. बीएसएफकडून जोरदार हल्ला करत हा प्रयत्न हाणून पाडला. भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार झाला. भारताने पाकिस्तानच्या सात दहशतवाद्यांचा खात्मा केला.

8 आणि 9 मे 2025 च्या मध्यरात्री पाकिस्तानकडून पश्चिम सीमेवर ड्रोन आणि इतर शस्त्रसामग्रीचा वापर करून अनेक हल्ले केले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने अनेक वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारताने हे ड्रोन हल्ले प्रभावीपणे परतवून लावले आणि सीएफव्हींना योग्य प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्य राष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे. सर्व नापाक योजनांना जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असं ट्विट इंडियन आर्मीकडून करण्यात आलं होतं. काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधी केली जात आहे. या गोळीबाराच्या आडून पाकिस्तान दहशतवाद्यांना भारताच्या हद्दीत पाठवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला.


Previous Post Next Post