सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर दोषी तर राजू पाटीलची निर्दोष सुटका
पनवेल(वार्ताहर)
सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. मागील सात वर्षांपासून या प्रकरणावर कोर्टात सुनावणी सुरू होती. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर पनवेल सत्र न्यायालयाचे न्यायाधीश केजी पांडेवाल यांनी निकाल सुनावला आहे. या प्रकरणी न्यायालयाने मुख्य आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर हाच दोषी असल्याचं म्हटलं आहे. तो कलम ३०२ अंतर्गत दोषी आढळला आहे. महेश फळणीकर आणि कुंदन भंडारी हे मृतदेहची विल्हेवाट लावण्यासाठी सहभागी असल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. तर आरोपी राजू पाटील याची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. या प्रकरणी ११ एप्रिल रोजी शिक्षा सुनावली जाणार आहे.
अश्विनी ब्रिदे 11 एप्रिल 2016 रोजी बेपत्ता झाल्या होत्या. घटनेच्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास त्या अभय कुरूंदकरला भेटायला पोलीस ठाण्यात गेल्या होत्या. यानंतर अभय कुरूंदकर हे बिद्रे यांना कारमध्ये घेऊन भाईदरच्या दिशेने रवाना गेला. याचवेळी कारमध्येच कुरूंदकरने बिद्रे यांची गळा दाबून हत्या केली ही घटना 11 एप्रिल 2016 रोजी सायंकाळी 6. 41 ते रात्री 11.11 च्या दरम्यान घडली. त्यानंतर रात्री 11.18 वाजता बिद्रे यांचा मोबाईल बंद झाला. हत्या केल्यानंतर आरोपीनं लाकडं कापायच्या कटरने अश्विनी यांच्या शरीराचे तुकडे केले. कुरूंदकर आणि फळणीकरने राजू पाटील आणि खासगी चालकाला सोबत घेत मध्यरात्री अश्विनी बिद्रेचे तुकडे कारमधून वसईच्या खाडीत फेकला. असा आरोप होता.
