Home

चौल सागमाळा येथील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.


 चौल सागमाळा येथील श्री राम मंदिरात रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा.


अलिबाग (ओमकार नागावकर) 

चैत्र शुध्द नवमीला प्रतिवर्षीप्रमाणे अलिबाग तालुक्यातील चौल सागमाळा येथील प्रसिद्ध श्री राम मंदिरात श्री रामनवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी श्री राम जन्मोत्सवावेळी किर्तनकार ह.भ.प. साहित्यिक कथाकार विजय महाराज आर्दड, गेवराई यांनी राम जन्माची कथा सांगितली व प्रसाद म्हणून सुंठवडा वाटप करण्यात आला.यावेळी असंख्य भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती.

              सालाबादप्रमाणे श्री रामनवमी निमित्त रात्री ठीक १०.०० वाजता पालखी काढण्यात येते. यावेळी लाठीकाठी, मल्लखांब अशा मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिके करण्यात येतात. श्री रामजी देवस्थान ग्रामस्थ मंडळाच्या वतीने श्री राम नवमी कार्यक्रम आगदी शिस्तबद्ध व जोशात संपन्न होतो. चौल सागमाळा येथील प्रसिद्ध श्री राम मंदिर हे रेवदंडा,चौल, नागाव या पंचक्रोशीतील प्रख्यात मंदिर असून येथील श्री रामनवमी व श्री हनुमान जयंती अगदी जोशात साजरी करण्यात येते. 

रामनवमीचे महत्त्व

रामनवमी संपूर्ण भारतात साजरी केली जाते. तेलंगणातील भद्राचलम मंदिर हे अशा ठिकाणांपैकी एक आहे जिथे रामनवमी मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. चैत्र नवरात्रीचीही समाप्ती रामनवमीच्या दिवशी होते. हिंदू धर्मग्रंथानुसार, भगवान श्री रामजींचा जन्म या दिवशी झाला होता, म्हणून भक्त ही शुभ तिथी राम नवमी म्हणून साजरी करतात आणि पवित्र नद्यांमध्ये पवित्र स्नान करतात.

Previous Post Next Post