Home

उरण मुळेखंड शाळेचे शिक्षक संजय होळकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


 

उरण मुळेखंड शाळेचे शिक्षक संजय होळकर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित


अलिबाग (प्रतिनिधी)

      

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई रायगड जिल्हा आयोजित पनवेल पत्रकार संघ वर्धापन दिनानिमित्त विविध क्षैत्रात उल्लेखनिय कार्य करणा-या गुणवंत व्यक्ती संस्था ग्रामपंचायत यांचा सन्मान सोहळा रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल  येथे आयोजित करण्यात आला होता. या राज्यस्तरीय सत्कार सोहळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक उत्कृष्ट शिक्षक, सामाजिक प्रशासकीय सेवेत अग्रणी लोकांचा व नामांकित संस्थांचा  सन्मान करण्यात आला. 

या कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातून उरण  तालुक्यातील पी. एम. श्री.प्राथमिक शाळा मुळेखंड शाळेचे उपक्रमशील,तंत्रस्नेही,विविध सामाजिक,साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रात 35 हून अधिक सन्मान,पुरस्कार प्राप्त व रायगड जिल्हा परिषद शिवभूमी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री.संजय जयराम होळकर यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला नामदार कॅबिनेट मंत्री मा.श्री.भरतशेठ गोगावले साहेब, मावळ मतदार संघ खासदार मा.श्री.श्रीरंग आप्पासाहेब बारणे यांची ऑनलाइन उपस्थिती व शुभ संदेश लाभले तसेच पनवेल मतदार संघ आमदार माननीय श्री. प्रशांत ठाकूर साहेब पनवेल महानगरपालिका माजी  विरोधी पक्ष नेते माननीय श्री.प्रीतम दादा म्हात्रे गोरगरिबांचे आधारवड म्हणून वैद्यकीय क्षेत्रात सेवा करणारे डॉक्टर गिरीश गुणे, झी 24 तास  वाहिनी वृत्त निवेदिका श्रीमती मनश्री पाठक, सिने अभिनेत्री श्रीम.हेमांगी खोपकर राव श्रीमती विद्या ठाकूर मॅडम महाराष्ट्र राज्य कोकण विभाग प्रदेशाध्यक्ष श्री शैलेश पालकर रायगड जिल्हाध्यक्ष श्री. राकेश खराडे पनवेल तालुका अध्यक्ष श्री.सुनील पाटील पनवेल शहर जिल्हाध्यक्ष श्री. शैलेश चव्हाण  सर्व कार्यकारणी व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous Post Next Post