Home

लाडकी बहीण योजना सुरु ठेवणारच; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचे मोठे विधान



लाडकी बहीण योजना सुरु ठेवणारच; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांचे मोठे विधान

अहिल्यानगर(सावली डिजिटल न्युज)

 लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही वचन दिलंय आणि दिलेल्या वचनापासून आम्ही फारकत घेणार नाही.' असे वक्तव्य महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी केलं आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले शहरात राष्ट्रवादीचे आमदार किरण लहामटे यांच्या पुढाकारातून महिलांसाठी कळसूआई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत हे मोठं विधान केलं.

आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत मोठं विधान केले. लाडकी बहीण योजना चालूच ठेवणार आहोत. महिलांमध्ये आर्थिक साक्षरता आणणार आहोत. २१०० रुपये देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला जाईल. आम्ही २१०० देण्याचं वचन दिलंय. आम्ही दिलेल्या वचनापासून फारकत घेणार नाही.', असे त्यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजनेवर टीका करणाऱ्या विरोधकांना आदिती तटकरे यांनी उत्तर दिलं. त्यांनी सांगितले की, 'लाडकी बहीण योजना सुरुवातीपासून विरोधकांच्या नजरेत खुपतेय. 

योजना लागू झाल्यापासून विरोधकांनी कधी प्रशंसा केली नाही. विरोधक त्यांच्या मनातील नैराश्य या योजनेवर काढताय.', अशा शब्दात आदिती तटकरे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले. आमचे सरकार आल्यानंतर लाडक्या बहिणींना २१०० रुपये हफ्ता देऊ अशी घोषणा विधानसभा निवडणुकीच्या आधी महायुतीच्या नेत्यांनी केली होती. सरकार स्थापन होऊन आणि अर्थसंकल्प सादर होऊन बरेच दिवस झाले तरी २१०० रुपयांबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. लाडक्या बहिणी देखील २१०० रुपये हफ्ता मिळण्याची वाट पाहत आहेत. अशामध्ये विरोधक सरकारवर टीका करत आहेत

Previous Post Next Post