सामाजिक कार्यकर्त्या शारदा भुयार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार.
यांची बावीस जिल्ह्या मध्ये स्त्री शक्ति मंच संघटनेच महिला संघटन असुन महिला उत्कृष्ट कार्य करत आहे.तळागाळातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा खेडयापासुन तर शहरापर्यंत महिला सक्षमीकरण करण्यासाठी संघटन असुन प्रत्येक जिल्ह्यातून महिला कार्यरत आहेत हे विशेष....
शारदा ताई विदर्भ लेखिका सदस्या, जिल्हा प्रबोधिनी न्युज जिल्हा प्रतिनिधी, आहेत.
त्यांचा विस्तव काव्यसंग्रह प्रकाशित आहे विख्यात साहित्यिक डॉ गंगाधर पानतावणे सरांची प्रस्तावना आहे.कारजा लाड येथील पहिल्या च महिला त्यांनी अंकुश राज्यस्तरीय काव्यसंग्रह प्रकाशित केला असुन ...त्यांच्या आकाशवाणी नागपूर, अकोला साहित्य प्रकाशित होत असत साहित्यातून समाजप्रबोधन करत असतात.
प्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांनी औरंगाबाद सावित्रीबाई फुले विद्यापीठात त्यांची सावित्रीबाई फुले कविता गाऊन म्हटली.
आज कारंजा लाड येथे वैदर्भीय नवनाथ ट्रस्ट द्वारे सामाजिक उल्लेखनीय कार्यासाठी राज्यस्तरीय महाराष्ट्र भुषण पुरस्काराने गौरवण्यात आले सौ शारदा अतुल भुयार यांना आमदार सईताई डहाके, आमदार हरिषभाऊ पिंपळे,पुनमताई पवार स्वागताध्यक्ष निलेश सोमानी, स्वागताध्यक्ष गीरीलालजी सारडा , प्रमुख अतिथी संजय कडोळे व इतर मान्यवर उपस्थित होते
