Home

देवळे येथे श्री खड्गेश्वर महाशिवरात्री उत्सवानिमित्त कवितांचा पडला पाऊस



देवळे येथे श्री खड्गेश्वर महाशिवरात्री उत्सवानिमित्त कवितांचा पडला पाऊस

देवरूख(वार्ताहर)

संगमेश्वर तालुक्यातील देवळे येथील स्वयंभू श्री खड्गेश्वर महाशिवरात्री उत्सवानिमित्त बुधवारी ठिक -६  वा. कवितांगण ग्रुप, देवळे यांच्या कवींचे वाड्मयीन व नवकवितांचे काव्य संमेलन नुकतेच पार पडले. या कवी संमेलनामुळे देवळेत कवितांचा पाउसच पडला.

यंदाचे हे संमेलनचे दुसरे वर्ष होते. या छोट्या कवितांगण कवी परिषदेचे आद्य संस्थापक श्री.भूपालदादा चव्हाण व या परिषदेचे निर्माते डॉक्टर श्री.चंद्रकात वाजे साहेब या दोघांच्या संकल्पनेतून ह्या परिषदेची व संमेलनाची  प्रत्यक्षाता अवतीर्ण झालेली आहे.अष्टाक्षरी, गझल, वृत्तबद्ध कविता व नवकवितांचे अविस्मरणीय आविष्कार काव्य रसिकांना आज अनुभवण्यासाठी मिळाले.संमेलनाची सुरुवात मा.श्री . श्रीकांत तथा नाना वळामे,श्री.संजय काळोखे,श्री.सदाशिवकाका करकरे यांच्या उपस्थितीत दिपप्रज्वलन व शारदा पूजनाने व श्री.नाना वळामे ,संजय काळोखे यांच्या शुभेच्छा पर मनोगताने संपन्न झाली. त्यानंतर भूपाल चव्हाण, डॉ.वाजे,सौ. मिनल तवटे तथा वैशाली  काळोखे,सौ.प्रज्ञा सप्रे,श्री.शिवराम घागरे,श्री.गजानन मोघे , डॉ.गणेश देसाई,श्री. सुहास परशेट्ये, श्री.राहुल सिदम ,सौ.रिया गुरव तथा श्वेतांबरी गुरव,कु.अपूर्वा भोसले इ.सुमारे ११कवींची काव्य प्रतिभा रसिकांना अनुभवायला मिळाली. 

भूपाल चव्हाण, वैशाली काळोखे , डॉ.वाजे ,रिया गुरव यांच्या कविता प्रगल्भ व्याकरण, भाषा समृद्धता, आणि सराईत व्यावसायिकता स्पष्ट करणारी होत्या.तर नवोदित राहुल, अपूर्वा,यांची नवकाव्ये अत्यंत मृदू आणि तरलता निर्माण करणारी होती.राहुल यांने वीररस सुध्दा अप्रतिम पणे शंभूराजे काव्यात वापरला. डॉ.गणेश यांच्या विद्रोही काव्यांचा व समग्र कवितांचा अनुभव बंद घराची व्यथा , तसेच सुहास यांच्या हिंदी शायरी काव्यांचा व विनोदी काव्यांचा प्रत्यंतर रसिकांना मिळाला.कवी शिवराम मुळातील लेखक पण लेखकाचे कवित्व त्यांनी स्त्री सन्मान व अध्यात्मिक यात चपखलपणे साध्य केले.श्री.गजानन मोघे गुरुजी यांनी आपली ऐतिहासिकता व नाट्य अभिव्यक्ती आपल्या काव्यातून प्रस्तुत केली.आमच्या कार्यक्रमासाठी प्रसिध्दी देणारे  प्रकाश चाळके यांची पत्रकारिता आज राजकारणांवर काव्यातून बरसली. असे हे कवी साहित्य संमेलनच देवळे येथे स़ंपन्न झाले.लोकांची अखेर पर्यंतची उपस्थिती हे या काव्य रसिकतेची व सुजाण रसिकत्वाची साक्ष देणारी होती.यातच या कार्यक्रमाची यशस्विता सिध्द करणारी आहे. शेवटी कार्यक्रमाची प्रगल्भ मिमांसा करतांना बन्सीधर आठल्ये यांनी सर्व कवींसाठीचे केलेले प्रशंसोद्गगार सर्वांनाच अत्यंत स्पृहणीय व अत्यंत प्रेरणादायी होते. 

Previous Post Next Post