किल्ले सागरगड येथे शिवाजी महाराजांच्या नवीन स्मारकाचा पुजन सोहळा संपन्न
अलिबाग (सचिन पाटील)
अलिबाग तालुक्यातील किल्ले सागरगडावर सागरगड दुर्गसेवक सामाजिक संस्था अलिबाग महाराष्ट्र राज्य यांच्यावतिने दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती उत्सव व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नवीन स्मारकाचा पूजन सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषात सकाळी अभिषेक, शिव जन्मसोहळा झाल्यानंतर या सोहळ्यासाठी उपस्थित असेलेल्या सर्व शिवप्रेमीनी मिष्ठान्न भोजनाचा आस्वाद घेतला, या सोहळ्यासाठी सागरगड दुर्गसेवक सामाजिक संस्था अलिबाग महाराष्ट्र संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत शिवाजी पाटील, शिवजयंती उत्सवाचे अध्यक्ष जयेश प्रकाश पाटील, संस्था उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व सर्व सभासद सागरगड पंचक्रोशी ग्रामस्थ यानी मोलाचे सहकार्य केले
