पुण्यात जीबीएसमुळे आणखी दोघा रुग्णांचा मृत्यू; मृतांची संख्या ११ वर गेली
पुणे(वार्ताहर)
पुण्यासह राज्यभरात ‘जीबीएस’ चा कहर सुरूच आहे. पुण्यात रुग्णसंख्या कमी झाली असली तरी बाधित रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही वाढतच आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये दौंड येथील ३७ वर्षीय तरुण व सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी येथे राहणाऱ्या २७ वर्षीय तरुणीच ‘जीबीएस’ चे उपचार घेत असताना मृत्यू झाला. त्यामुळेआतापर्यंत एकूण मृतांची संख्या 11 झाली आहे. आतापर्यंत पुण्यात ‘जीबीएस’ च्या रुग्णांची संख्या २११ वर पोहोचली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ससून सर्वोपचार रुग्णालयात 37 वर्षांच्या पुरुषाचा जीबीएसमुळे मृत्यू झाला. मतृत इसम हा सोनवडी (ता. दौंड) येथील रहिवासी होता. काही दिवसांपूर्वी त्याला उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या हातांमध्ये अशक्तपणा जाणवत होता. त्याला आयव्हीआयजी इंजेक्शन देण्यात आले होते. त्याच्या तपासणीत जीबीएसचे निदान झाले होते. प्रकृती बिघडल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र 17 फेब्रुवारीला उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर पुण्यातील खासगी रुग्णालयात 25 वर्षीय महिलेचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. ती नांदेड सिटीमधील रहिवासी होती. तिला 15 जानेवारीला जुलाबाचा त्रास झाला. त्यानंतर गिळण्यास त्रास सुरू होऊन तिला बराच अशक्तपणा जाणवू लागला. त्या तरूणीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती बिघडल्याने तिलाही व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
अखेर 18 फेब्रुवारी रोजी तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत जीबीएसमुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर राज्यातील जीबीएस बाधितांची एकूण संख्या 200 च्या वर पोहोचली आहे. जीबीएसच्या पहिल्या रुग्णाचा मृत्यू सोलापूरमध्ये झाला. हा रुग्ण पुण्यातून सोलापूरला गेला होता. त्यानंतर पुण्यात ९ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ आणि पुणे महापालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे म्हणाल्या की, पुण्यात नवीन संशयित जीबीएस रुग्णांची संख्या लक्षणीय रित्या घटली आहे. प्रशासनाने केलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमुळे हे घडले आहे. बोराडे म्हणाले की, सध्या आयसीयू मध्ये मोठ्या संख्येने रुग्ण दाखल असून व्हेंटिलेटरवर रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. गंभीर रुग्णांच्या बाबतीत मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. हे रुग्ण गंभीर असून यातील बहुतांश रुग्णांवर गेल्या अनेक दिवसांपासून उपचार सुरू आहेत. रुग्ण असलेल्या रुग्णांमध्ये मृत्यूचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी मृत्यू होण्याची शक्यता आहे.
https://chat.whatsapp.com/FQUAzEdhjMe0Mpm11Qwoel
💁♂️ *बातम्या व जाहिरातीसाठी*
📱 *संपर्क-* 9325592393
*सर्वेसर्वा- निलेश जाधव, देवरुख*