Home

आदिती दळवी यांची रायगड जिल्हा महिला क्रिकेट प्रमुखपदी नियुक्ती


 

आदिती दळवी यांची रायगड जिल्हा महिला क्रिकेट प्रमुखपदी नियुक्ती 


अलिबाग(प्रतिनिधी)


रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील महिलांच्या क्रिकेट संघटनेच्या प्रमुखपदी आदिती दळवी यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.

 आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील, सचिव प्रदिप नाईक, उपाध्यक्ष राजेश पाटील, सदस्य प्रदीप खलाटे, डॉ. राजाराम हुलवान यांनी त्यांना नियुक्तीचे पत्र दिले. ह्यावेळी अलिबाग-मुरुडचे आमदार महेंद्र दळवी उपस्थित होते.

सध्या पुरुषांच्या बरोबरीने महिलांचे क्रिकेट सुद्धा प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. रायगड जिल्ह्यात जवळपास सर्व क्रिकेट अकॅडमीमध्ये मुलींचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. भविष्यात रायगड जिल्ह्यात महिलांच्या क्रिकेट स्पर्धा आयोजित करणे, त्यांना योग्य प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यासाठी विविध प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्याची प्रमुख जबाबदारी आदिती दळवी यांच्याकडे असणार आहे. त्यांच्या नियुक्तीने रायगड जिल्ह्यातील महिलांच्या क्रिकेटला नवसंजीवनी मिळणार असल्याचे आरडीसीएचे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील यांनी सांगितले.

Previous Post Next Post