Home

चिपळूण तालुक्यातील आगवे येथे विहिरीत पडला गवा; वनविभागाने गव्याला सुखरूप बाहेर काढले


 

चिपळूण तालुक्यातील आगवे येथे विहिरीत पडला गवा; वनविभागाने गव्याला सुखरूप बाहेर काढले

चिपळूण(वार्ताहर)

चिपळूण तालुक्यातील आगवे येथील लोटाची बाव या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी गवा रेडा विहिरीत पडला. वनविभागाने या गव्याला सुखरूप विहीरीबाहेर काढत त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले आहे. 

आगवे येथील लोटाची बाव या स्थानिक नावाने ओळखल्या जाणाऱ्या ठिकाणी गवा रेडा विहिरीत असलेबाबात पोलिस पाटील आगवे यांनी भ्रमणध्वनी वरून आज बुधवारी वनविभागाला माहिती दिली.  त्यानुषंगाने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सदरच्या घटनेची जागेवर जाऊन पाहणी करून वरिष्ठांचे मार्गदर्शनात जेसीबीच्या साहाय्याने विहिरीचे एका बाजूने मार्ग करून गव्याला विहिरीच्या बाहेर सुखरूप काढले व नैसर्गिक अधिवासात मुक्त केले. या बचावकार्य प्रसंगी वनपाल सावर्डे श्री उमेश आखाडे व वनरक्षक नांदगाव श्री अनंत मंत्रे उपस्थित होते. 


Previous Post Next Post