सांगलीतील खाद्यपदार्थाच्या गोदामाला भीषण आग; कोट्यावधीचे नुकसान
सांगली(वार्ताहर)
सांगलीतील खाद्यपदार्थाच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत कोट्यावधीचा तयार माल जळून खाक झाला आहे. आज सकाळच्या सुमारास ही आग लागली. काही वेळात आगीने रौद्र रूप धारण केले होते. त्यामुळे आकाशात धुरांचे लोळ उठले होते.
शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीची माहिती मिळताच आसपासच्या अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या, पाच ते सात अग्निशमन दलाच्या गाड्यांनी या आगीवर भीषण आगीवर नियंत्रण मिळवले, मात्र आगीमध्ये कोट्यावधी रुपयांचा तयार झालेले खाद्यपदार्थ व साहित्य जळून खाक झाले.
