आरोग्य आणि रोजगारावर जास्त लक्ष दिले जाणार, पुढील ५ वर्ष विकासाची संधी देणार- अर्थमंत्री निर्मला सीतारमन
विकसित भारतासाठी अर्थसंकल्प-निर्मला सीतारमन
नवीदिल्ली(प्रतिनिधी)
आम्ही विकसित भारतासाठी अर्थसंकल्प सादर करत आहोत. आरोग्य आणि रोजगारावर जास्त लक्ष दिले जाणार, पुढील 5 वर्ष विकासाची संधी देणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटले. निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली आम्ही अर्थव्यवस्थेला गती देऊ. कापूस उत्पादकता वाढवण्याला प्रोत्साहन देणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी म्हटले. निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली की किसान क्रेडिट कार्ड (KCC) द्वारे कर्ज मर्यादा 3 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये झाली आहे. राज्यांच्या साह्याने ‘प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजने’ला बळकटी मिळाल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे.
5 वर्षांत 7500 मेडिकल सीट्स वाढवणार असल्याची अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची मोठी घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर होण्याआधी विरोधकांची घोषणाबाजी सुरु केली.
सीतारामन यांच्या बजेट भाषणातील काही ठळक मुद्दे
- तरुणांना रोजगार देण्यावर प्राधान्य
- डाळींमध्ये स्वयंपूर्णतेचे ध्येय
- बिहारमध्ये माखाना बोर्ड स्थापन केले जाईल
- मच्छीमारांसाठी विशेष अर्थव्यवस्था
- कर, ऊर्जा आणि शहरी विकासावर लक्ष
- गरीब, तरुण, शेतकरी आणि महिला शक्तीवर लक्ष
- लघुउद्योगाद्वारे ७.५ कोटी जणांना रोजगाराची संधी निर्माण करणार
मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठी योजना
सी फूडला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठी योजना सुरू करण्याचाही सरकारचा प्रस्ताव असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. याशिवाय मत्स्य उत्पादनाला चालना देण्यासाठी मोठी योजना प्रस्तावित आहे. मत्स्यनिर्यातीसाठी 60 कोटी रुपय खर्च केले जाणार
