Home

सौ.प्रणाली मंगेश म्हात्रे यांना गझलयात्री पुरस्कार


 सौ.प्रणाली मंगेश म्हात्रे यांना गझलयात्री पुरस्कार 

मुंबई (प्रतिनिधी)

दिनांक .१९ जानेवारी २०२५ रोजी विष्णुदास भावे सभागृह, वाशी नवी मुंबई इथे झालेल्या राज्यस्तरीय अखिल भारतीय महिला गझल संमेलनात सौ.प्रणाली मंगेश म्हात्रे यांना गझलयात्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या विशेष सोहळ्यात प्रसिद्ध समाजसेविका मा.सिंधुताई सकपाळ यांच्या ज्येष्ठ कन्या ममता सिंधताई यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.सौ.प्रणाली मंगेश म्हात्रे या गझल मंथन साहित्य संस्थेच्या मुंबई जिल्हा कार्यकारिणीवर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.गझल मंथन संस्थेसाठी केलेल्या विशेष कार्यासाठी हा पुरस्कार प्रदान केला जातो असे प्रतिपादन संस्था अध्यक्ष मा.अनिल कांबळे सर यांनी केले आहे.

Previous Post Next Post