मुंबई 26/11 हल्ल्याच्या मास्टरमाईंडला भारतात आणणार; तहव्वूर राणाच्या प्रत्यर्पणाला अमेरिकेची मंजुरी
नवीदिल्ली(प्रतिनिधी)
मुंबई हल्ल्यातील मास्टरमाईंड तहव्वूर हुसेन राणा याच्या प्रत्यर्पणाचा मार्ग मोकळा झाला आहे. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. भारतासाठी हे मोठे यश मानले जात आहे. 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी राणाच्या प्रत्यार्पणाची भारताने अनेक दिवसांपासून मागणी केली होती. राणावर मुंबईत येऊन रेकी केल्याचा आरोप आहे. यासोबतच त्याच्यावर लष्कर आणि आयएसआयसाठी काम केल्याचाही आरोप आहे.
तहव्वूर राणा सध्या लॉस अँजेलिस येथील मेट्रोपॉलिटन डिटेन्शन सेंटरमध्ये कोठडीत आहे. 13 नोव्हेंबर 2024 रोजी राणाने प्रत्यार्पणाच्या निर्णयाविरुद्ध अपील केले होते, जे 21 जानेवारी रोजी अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने फेटाळले. यापूर्वी त्याने सॅन फ्रान्सिस्को न्यायालयात अपील केले होते, जिथे त्याची याचिका फेटाळण्यात आली होती. दोन्ही देशांमधील प्रत्यार्पण करारानुसार त्याला भारतात पाठवले जाऊ शकते, असे अमेरिकन न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले होते. मुंबई हल्ल्याच्या आरोपपत्रातही राणाच्या नावाचा आरोपी म्हणून उल्लेख आहे. त्यानुसार राणा हा आयएसआय आणि लष्कर-ए-तैयबाचा सदस्य आहे. आरोपपत्रानुसार तहव्वूर राणा हल्ल्याचा मुख्य आरोपी डेव्हिड कोलमन हेडली याला मदत करत होता. 27 वर्षांपूर्वी झालेल्या या हल्ल्यात 160 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला होता.
तहव्वूर राणा एकेकाळी पाकिस्तानी लष्करात डॉक्टर होता आणि 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई हल्ल्यात त्याचा हात असल्याचा आरोप आहे. २६ नोव्हेंबर २००८ रोजी समुद्रामार्गे भारतात शिरलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांनी मुंबईवर हल्ला केला. या हल्ल्यात १६६ लोकांनी आपला प्राण गमावला. तरस, ३०० जण जखमी झाले. मृतांमध्ये काही अमेरिकन नागरिकांचाही समावेश आहे. दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत पोलिसांनी ९ दहशतवाद्यांना ठार केले. आणि अजमल कसाबला अटक केली. त्याला २०१२ मध्ये फाशी देण्यात आली होती. राणा-हेडलीने मुंबई हल्ल्याची ब्ल्यू प्रिंट तयार केली होती. मुंबई पोलिसांच्या आरोपपत्रानुसार, राणा भारतात आल्यानंतर हल्ल्याचे ठिकाण आणि राहण्याची ठिकाणे सांगून दहशतवाद्यांना मदत करत होता. राणानेच ब्ल्यू प्रिंट तयार केली होती, ज्याच्या आधारे हा हल्ला करण्यात आला होता. मुंबई हल्ल्याचा कट रचण्यात राणाची मोठी भूमिका होती, असे आरोपपत्रात म्हटले आहे.
