डेविड स्कुल चोंढी येथील शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन संपन्न.
अलिबाग(सचिन पाटील)
अलिबाग तालुक्यातील नांमाकित सी.बी.सी. बोर्डाची शाळा म्हणून ओळख असलेली शाळा म्हणून डेविड स्कुल कडे पाहिजे जाते या वेळी शाळेच्या वतीने प्रमुख मान्यवर म्हणून प्रसिद्ध महिला विधिज्ञ ॲड गीता दर्शन म्हात्रे यांना निमंत्रण केले होते. अतिशय भव्य दिव्य स्टेज तसेच उत्तम प्रकारे नियोजन शाळेच्या वतीने करण्यात आले होते छोट्या, मोठ्या बाल कलाकाराने सर्वांचे सर्व प्रकारचे नृत्य, गाणी, अभिनयातून लक्ष वेधून घेतले होते. या वेळी चिप गेस्ट म्हणून उपस्थित असलेल्या ॲड गीता म्हात्रे मॅडम यांनी शाळेचे कौतुक करत असताना या शाळेतील मुलं वाहतूक करणारे वाहन चालक ,तसेच पालक यांचे देखील कौतुक केले. शाळेच्या शिस्ते सोबत वाहतुकीची शिस्त देखील या शाळेमध्ये पहावयास मिळते. वाहतुक शाखेचे पोलीस कर्मचारी नेहमीच या बाबत स्तृती करत असतात. आपल्याला दोन मुलं घरामध्ये सुट्टी असली की कसे वाटते मात्र एक शिक्षक चाळीस ते पंन्नास विद्यार्थांन सोबत राहून त्यांना शाळेमध्ये जबाबदारीने सांभाळ करित असतो. हेही कौतुकास्पद आहे. मुलांन जवळ मोबाईल असतांना ते मोबाईल मध्ये काय पाहत आहेत या कडे लक्ष देणे गरजेचे आहेत. सायबर गुन्हांचे वाढते प्रमाण लक्षात घेता. या वर लक्ष न ठेवल्यास विपरीत परिणाम घडू शकतात त्या करिता रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्यातील शाळा तसेच कंपन्या या मध्ये जनजागृती तसेच मार्गदर्शन होणे गरजेचे असल्याने त्या कडे विशेष लक्ष केंद्रीत करून अनेक ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत. गीता म्हात्रे मॅडम यांनी मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले. शाळा प्रशासनान तसेच मुख्याध्यापीका मॅडम तसेच पालक वर्गाने गीता म्हात्रे मॅडम यांचे कार्यक्रम संपल्यानंतर विशेष आभार मानले अश्या प्रकारे खेळी मेळीच्या वातावरणात वार्षिक स्नेह संमेलन संपन्न झाले.s
