Home

नराधमाला फाशी द्या...उ.बा.ठा. पक्षाच्या समस्त महिला आघाडी कडून अलिबाग मधे आंदोलन


 

नराधमाला फाशी द्या...

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या समस्त महिला आघाडी कडून अलिबाग मध्ये आंदोलन.


अलिबाग(ओमकार नागावकर)

 बदलापूरमध्ये दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराने महाराष्ट्र हादरला आहे. तीन ते चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेतील स्वच्छतागृहातील स्वच्छता कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्या घटनेचा तीव्र निषेध करत दि.२१ रोजी शिवसेना मध्यावर्ती कार्यालय अलिबाग येथे आंदोलन करण्यात आले.

दिलेले निवेदन

         अलिबाग तालुक्यातील समस्त महिला आघाडी कडून बदलापूर येथे लहान मुलीवर अत्याचार झाला त्याबाबत आम्ही आपणांस निवदेन देत आहोत, की सदर प्रकारातील गुन्हेगारास कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. जेणे करून असे प्रकार पुन्हा पुन्हा होणार नाहीत व असे प्रकार करू पाहणाऱ्या नराधमास दहशत बसेल. तरी कृपया वरिल प्रकारातील गुन्हेगारास कठोरातील कठोर सजा देणेत यावी असे निवेदन जिल्हा अधीक्षक सोमनाथ घार्गे यांना देण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख शंकर गुरव, उपजिल्हा संघटक अजित पाटील, विभाग प्रमुख गिरीश शेळके, प्रवक्ते धनंजय गुरव, महिला आघाडी विधानसभा संघटिका तनुजा पेरेकर, तालुका संघटिका स्नेहल देवळेकर, उपतालुका संघटिका वंदना पाटील, मापगाव विभाग संघटिका निवेदिता गावंड, उपविभाग संघटिका तृप्ती जावकर आदी शिवसेना कार्यकर्ते उपस्थित होते.


Previous Post Next Post