सेल्फी विथ हनी बीज
आंतरराष्ट्रीय पुरस्कार वितरीत
पुणे(प्रतिनिधी)
सांजभेट आणि वर्ल्ड क्वीन बीज संस्थेतर्फे संयुक्त रित्या एकल व्यक्तिंचा मेळावा आणि
सेल्फि विथ हनी बीज स्पर्धेतील 50 विजेत्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
अध्यक्ष.स्थानी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विचारवंत, साहित्यिक डाॅ.मधुसूदन घाणेकर होते.वर्ल्ड क्वीन बीजच्या अध्यक्ष मधुकर्णिका सारिका सासवडे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. डाॅ.मधुसूदन घाणेकर
यांच्या शुभहस्ते सेल्फी विथ हनी बीज स्पर्धेतील 50 विजेत्यांना आंतरराष्ट्रीय पुरस्काराने जाहिररित्या सन्मानीत करण्यात आले.
मधुकर्णिका सारिका सासवडे यांनी ' मधमाशी वाचवा :विश्व वाचवा ' या विषयावर मधमाशी प्रेमींना विस्तृत माहिती दिली.
' समाजाने मधमाशी वाचवण्याची मोहिम गतिमान करावे 'असे सांगून ' समाजाने
एकल व्यक्तिंना सातत्याने दिलासा द्यावा 'असै आवाहन
डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.याप्रसंगी साहित्य गौरव संस्थेच्या कार्याध्यक्ष मंदाताई नाईक, तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक-अध्यक्ष
प्रिया दामले , युनिव्हर्सल
युथच्या सचिव सुचेता प्रभुदेसाई, ज्येष्ठ कलावंत
अरुणा कोठुळे, महिला सन्मान
संस्थेच्या अध्यक्षा भारती महाडिक, सुप्रसिध्द कवयित्री
दीपाराणी गोसावी आदिंनी
मनोगत व्यक्त केले. मधुकर्णिका सारिका सासवडे, उषा फाल्गुने, रविन्द्र गाडगीळ, शलाका गाडगीळ यांच्या शुभहस्ते डाॅ.मधुसूदन घाणेकर
संपादित डहाळी अनितकालिकाच्या 537 व्या
अंकाचे प्रकाशन करण्यात आले. भारतीय जनता पार्टी
ज्येष्ठ नागरिक आघाडीचे
शहर कार्याध्यक्ष श्रीनिवास तेलंग, बीजेपी ज्येष्ठ नागरिक आघाडी सांस्कृतिक विभागाचे
सरचिटणीस श्रीनिवास तेलंग, वसुधा इंटरनॅशनल संस्थेच्या च्या अध्यक्ष वसुधा नाईक आघाडीच्या कवयित्री ऋचा थत्ते,मधुरंगच्या उपाध्यक्ष मेघना घाणेकर आदि मान्यवर उपस्थित होते. अजिता मुळीक, पुरुषोत्तम कुंटे, योगेश हरणे, गणेश जामखेडकर, सुधाकर नाईक यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
उषा फाल्गुने यांचे शीळवादन,
दीपापाराणी गोसावी आणि सुचेता प्रभुदेसाई यांचे काव्य.सादरीकरण , शलाका
गाडगीळ यांचे गायन , अरुणा
कोठुळे,यांच्यामुळे कार्यक्रमाची
रंगत वाढली.
