दहावी बारावीच्या विदयार्थ्यांना वह्या वाटप
उरण(प्रतिनिधी)
जन सेवेतून आनंद देणा-या वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे सदस्य स्वर्गीय डाॅक्टर शरद पाटील यांच्या व्दितीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून सन 2024 मध्ये उत्तीर्ण झालेल्या दहावी आणि बारावी मधील विद्यार्थ्यांना 142 पानी लाँग बुक वह्याचे वाटप करण्यात आले.
स्वर्गीय डाॅक्टर शरद पाटील यांच्या परिवारातील सदस्य श्री.नितीन पाटील आणि एक तू ही निरंकार सांप्रदायाचे सेवक श्री.पद्माकर धर्माजी म्हात्रे यांच्या शुभहस्ते वह्यांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय शरद पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून अंधारावर मात करणा-या दोन पणत्या प्रकाशित करण्यात आल्या आणि आदरांजली अर्पण करण्यात आली.
या नंतर सौ.समिधा निलेश म्हात्रे माजी सभापती पंचायत समिती उरण यांच्या सौजन्याने इयत्ता अकरावीच्या निवडणूक सात मुलींना अकरावी सायन्सचे पुस्तकसेट वाटप करण्यात आले.
सदर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य श्री.सुनिल ठाकूर, श्री.पुरूषोत्तम पाटील,श्री.गणेश खोत, श्री.संदेश गावंड, श्री. सतिश पाटील अनंत पाटील,श्री. विश्वास पाटील,श्री.गणपत ठाकूर,श्री.अनंत तांडेल,श्री.पुरण पाटील,
श्री.बळीराम म्हात्रे, आदी मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे कार्यवाहक श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.
