Home

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर... कवी सचिन पाटील


 

*पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर*



कर्तृत्ववान तेजस्विनी अशी नारी

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर

शिवभक्तीच्या जोरावरती महाराणीने

राज्य केले अवघ्या रयतेच्या मनावर १


जनकल्याण्याचा ध्यास मनी अविरत 

यथोचित न्यायदानासाठी सुपरिचित 

आश्रयदात्री कैक मंदिराची होऊनिया

महेश्वर, इंदूर यांस करविले सुशोभित २


समाजहितार्थ सार्वत्रिक वावरताना 

आज पुण्यश्लोक म्हणुनी गौरवान्वित 

रोजगाराच्या योग्य उपलब्धतेसाठी 

असंख्य योजना केल्या कार्यान्वित३


पाण्याच्या मुबलक प्रमाणाकरिता

विहिरींची कामे जाती  पूर्णत्वाला 

समाजहित डोळ्यांपुढती राखत 

 प्रवर्तक लाभल्या  मंदिराला ४


जाणीव कर्तव्याची अंतरात जागृत

रोजगाराच्या संधी करविल्या उपलब्ध

सुवर्णकाळाची क्षणचित्रे आठवताना

कौतुकाने खचित मन होतसे स्तब्ध५


पुण्यश्लोक महाराणी अहिल्याबाई 

करावे चरणी विनम्र अभिवादन 

मुजरा  स्तुत्य सत्कार्याकरिता

मंदिरास अर्पण ज्यांचे जीवन ६


*सचिन पाटील*

*(अलिबाग रायगड)


Previous Post Next Post