Home

रेवती साळुंके यांच्या शब्दसारथी काव्यरथाचे काव्यसंग्रहास पुरस्कार

 


.रेवती साळुंके यांच्या 'शब्दसारथी काव्यरथाचे' काव्यसंग्रहास पुरस्कार

पुणे (प्रतिनिधी)

प्रसिद्ध कवयित्री व लेखिका सौ.रेवती प्रकाश साळुंके यांच्या शब्दसारथी काव्यरथाचे या अष्टाक्षरी काव्यसंग्रहास पुणे येथील चैत्रपालवी काव्य समूहाच्या वतीने चैत्रपालवी काव्य महोत्सवात काव्यगौरव या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

   याअगोदरही या काव्यसंग्रहास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ समरसता साहित्य परिषद व मातंग समाज परिषद यांच्या समन्वयाने 

मार्च २०२३मध्ये पुरस्कार प्राप्त झालेला आहे..हा या काव्यसंग्रहास मिळालेला दुसरा पुरस्कार आहे.. साहित्य क्षेत्रात सौ.रेवती साळुंके यांचे बरेच लिखाण झाले असून शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर त्यांनी ४२४ चारोळ्यांचे लेखन करून त्याचे ई बुक प्रकाशन केले आहे. काव्यसागर,मधुसिंधु या  प्रातिनिधिक काव्यसमूहात त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. फक्त सूर्याची स्तुती प्रभातपुष्पच्या माध्यमातून दररोज करून सहस्र शब्दपुष्प त्यांनी आदित्यचरणी अर्पण केले आहे त्यांचा आगामी काळात लवकरच चारोळीसंग्रह  प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

     ५मे रोजी  अ.भा.म.साहित्य संमेलनाचे ८९ वे संमेलनाध्यक्ष श्री.श्रीपाद सबनीस व ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांच्या हस्ते हा पुरस्कार एस.एम.जोशी सभागृह पुणे येथे प्रदान करण्यात आला.

    वरिल पुरस्कारांचे आयोजन कवी श्री.चंद्रकांत जोगदंड यांनी केले होते.


Previous Post Next Post