Home

ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.फिल्म प्रॉडक्शन महाराष्ट्र राष्ट्रीय पुरस्कार



 





ॐ साई विकास प्रतिष्ठान व बी. बी. सी. फिल्म प्रॉडक्शन महाराष्ट्र, राष्ट्रीय पुरस्कार...

पुणे(प्रतिनिधी)

   साईंच्या पवित्र भूमीत, शिर्डीमध्ये साई कलारत्न समाज भूषण पुरस्कार २०२४, नुकताच पार पडला.

   दिनांक ३/०५/२०२४ ला, मा. अध्यक्ष सुदाम संसारे सर व उपाध्यक्ष सौ. वंदना गव्हाणे ताई तसेच सल्लागार डॉ. श्री. अजय वारुळे सर व त्यांचे प्रतिनिधी यांच्या साथीने हा साई कलारत्न पुरस्कार थाटामाटात पार पडला.

    दीपज्योती प्रज्वलनाने कार्यक्रम सुरू झाला. साईंची आरती व गौ.बुद्धाची आरती म्हणण्यात आली. वातावरण भक्तीमय झाले होते.

   कार्यक्रमाचे निवेदन निशा या अभिनेत्रीने व डॉ.श्री.अजय वारुळे यांनी खूप सुरेख केले. दोघांनी गजानना श्री गणराया या भक्ती गीताने सर्वांची मने जिंकली.

   सावी या प्रसिद्ध मॉडेल अभिनेत्रीने भन्नाट एन्ट्री केली व 'रस्ते मे वो खडा था,जबसे मेरे पीछे पडा था ' या गाण्याच्या तालावर दोन मिनटे मस्त डान्स करून प्रेक्षकांची मने जिंकली.

   मा. सुदाम सरांचा वाढदिवस असल्याने त्यांचा वाढदिवस  साजरा करण्यात आला. जवळजवळ  पाचशे ते सहाशे लोक उपस्थित होते.

   या पुरस्कार सोहळ्यामध्ये सौ.वसुधा वैभव नाईक यांना देखील पुरस्कार प्राप्त झाला.

  माननीय राजेश काळे हे अभिनेता आहेत. तू फक्त हो म्हण, कल्टी मार, रावडी हे त्यांचे मराठी चित्रपट गाजलेले आहेत.

 त्याचप्रमाणे मराठी मालिका कुणब्याचे  पोरं ही मालिका गाजत आहे. इंस्टाग्राम वर रील स्टार म्हणून झळकत आहेत.

    अशा उत्तुंग भरारी घेणाऱ्या अभिनेत्याकडून सौ.वसुधा वैभव नाईक यांना समाजसेविका म्हणून गौरवण्यात आले. मानाचा फेटा, साईंची शॉल, मस्त ट्रॉफी, मेडल, प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते.

   या पुरस्कारासाठी अनेक मान्यवर कलावंत उपस्थित होते. चंद्रपूर, बुलढाणा, नागपूर, मुंबई, कोकण इत्यादी ठिकाणहून लोक पुरस्कार स्वीकारण्यासाठी आले होते.


Previous Post Next Post