मच्छीमारी करणाऱ्या कष्टकरी समजाला न्याय देण्याचे कार्य करणे गरजेचे - सुनील तटकरे
अलिबाग - अमुलकुमार जैन
मच्छीमारी करणाऱ्या कष्टकरी समजाला न्याय देण्याचे कार्य करणे गरजेचे आहे. कोळी समाजाचां भंडारा हा कष्टाचा असतो. अनंत गीते तीस वर्षे खासदार होते मात्र कोळी समाजासाठी काय केले. असा सवाल केला. तुम्ही मला मोठ्या मताधिक्याने विजयी कराल, असा विश्वास रायगड लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी रेवदंडा येथील भंडारी सभागृह कोळी महासंघाच्या ३२ रायगड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ सभेत येथे व्यक्त केला.
यावेळी व्यापीठावर आमदार महेंद्र दळवी, आमदार रमेश पाटील, कोळी महासंघाचे चेतन पाटील, प्रकाश बोबडी,भालचंद्र वर्सोलकर, रेवदंडा सरपंच प्रफुल्ल मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळा तेलंगे, जुळेखा तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सुनील तटकरे यांनी सांगितले की,देशात नरेंद्र मोदी यांचा सरकार आहे. देशाच्या भोवताली समुद्रा आहे नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य जनतेसाठी लोकहितवादी निर्णय घेतले .मच्छिमार यांच्या साठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आला. डिझेल निसर्ग चक्रीवादळात ते रायगड मध्ये स्थिरावले त्यामधे मच्छिमार बांधव मोठ्या प्रमाणात उद्ध्वस्त झाला. मच्छिमार बांधव परत समुद्रात जाण्यासाठी सज्ज झाला.अपयश जेव्हा पचवता येत नाही त्यावेळी आत्मपरीक्षण करायचे असते. ४० वर्षांत विकास हेच ध्येय ठेवून जनसामान्यांच्या कामासाठी पुढाकार घेत आलो आहे. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत विकास हेच ध्येय घेऊन काम करत राहणार.मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला.येणार्या संकटांना सामोरे जावून पुन्हा त्याच ताकदीने उभा राहतो. सर्वाधिक चलन माझ्या याच मच्छीमार बांधवांकडून मच्छीमारी व्यवसायातून देशाला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे नेतृत्व करत स्वराज्याचे रक्षण याच कष्टकरी समाजाने केले त्याबद्दल कोळी समाज महासंघाच्या मेळाव्यात कृतज्ञता व्यक्त केली. महायुतीच्यावतीने कोळी समाज महासंघाचा भव्य मेळावा रेवदंडा शहरात मोठ्या उत्साहात पार पाडत असताना माझा मच्छीमार बांधव दर्याच्या तुफानाला... येणार्या संकटांना सामोरे जातो ;याच कष्टकरी समाजाने हिंदवी स्वराज्याचे रक्षण केले.माझ्या मच्छीमार बांधवांचा डिझेलचा परतावा यापुढे कधी थकीत राहणार नाही, असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला असल्याचे सांगितले. तसेच नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर आणि मी केंद्रात खासदार म्हणून गेल्यानंतर केंद्रसरकारच्या माध्यमातून अनेक योजना मच्छीमार बांधवांच्या विकासासाठी राबवल्या जातील, असा शब्दही यावेळी दिला.अलिबाग मतदारसंघासाठी जयंत पाटील यांनी जितका निधी आणला नाही त्यापेक्षा तिप्पट निधी आमदार महेंद्र दळवी यांनी अलिबाग मतदारसंघात आणल्याचेही यावेळी स्पष्ट केले. जयंत पाटील कालच शरद पवारसाहेबांना घेऊन मोर्बा या गावी आले होते. परंतु त्या सभेला जिल्हयातील लोक आणूनही गर्दी झाली नाही इतकी गर्दी फक्त रेवदंडा मच्छीमार, कोळी बांधवांनी केली.
जयंत पाटील तुम्ही नितीमत्ता, राजकारण आणि अक्कल आम्हांला शिकवू नका, असे खडेबोल सुनावतानाच स्वतःचे आत्मपरीक्षण करा.तुमचा बालेकिल्ला म्हणता मग तुम्ही पिछाडीवर का गेलात यावर विचार न करता माझ्यावर टिका का करता, जयंत पाटील तुम्ही याठिकाणी सांगता की खूप काही केले परंतु शेकापला तुम्हीच लोकसभेतून हद्दपार केलेत. तुम्ही बोलताय की मी तुमच्याशी गद्दारी केली. २०१९ मध्ये मला शेकाप, काँग्रेसची मदत झाली पण त्याचवेळी मी विरोधात काम केले नाही. तुम्ही मला मताधिक्य दिलं सांगता आहात तर मग तुमचा बंधू ३५ हजारांनी महेंद्र दळवी समोर का पडले तेही सांगा
असा सवालही केला. अनंत गीते तुम्ही नशीबवान आहात मोदींच्या मंत्रीमंडळात तुम्हाला अवजड की अवघड खाते मिळाले. त्याचे महत्त्व तुम्हाला कधी कळलेच नाही. पाच वर्षांत तुम्ही मोदींच्या मंत्रीमंडळात काम करुनही एक रुपयांची गुंतवणूक आणता आली नाही. तुम्हाला लोकांच्या संवेदना कधी समजल्याच नाहीत, अशी खंत यावेळी व्यक्त केली.अपयश जेव्हा पचवता येत नाही त्यावेळी आत्मपरीक्षण करायचे असते. ४० वर्षांत विकास हेच ध्येय ठेवून जनसामान्यांच्या कामासाठी पुढाकार घेत आलो आहे. जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत विकास हेच ध्येय घेऊन काम करत राहणार असून त्यामुळेच तुम्ही मला लाखोंच्या फरकाने विजयी कराल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला. देशाच्या हितासाठी... राष्ट्रहितासाठी आम्ही एकत्र आलो आहोत...'घड्याळ तेच वेळ नवी' आहे. त्याचबरोबर घटना बदलली जाणार असा अभास निर्माण करण्याचा एकमेव कार्यक्रम विरोधकांकडे सध्या आहे. शेकाप हा एक छोटासा पक्ष पण जणू काही हाच भावी पंतप्रधान करणार असे दाखवत आहेत. इंडी आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही आणि त्यांनी जाहीर केला तर आघाडीचे तुकडे झालेले पहायला मिळतील.या मतदारसंघात ४ जूनला घड्याळयाचा गजर ऐकायला मिळेल आणि विधानसभेला महेंद्र दळवी यांच्या धनुष्यबाणावर सर्वाधिक मताधिक्य असेल, असे सांगतानाच यावेळी पहिल्यांदा घड्याळ या चिन्हासमोरील बटण तुम्हाला दाबायचे आहे. त्यामुळे उद्याच्या भविष्यात या भागाचे चित्र बदललेले दिसेल, असा विश्वास यावेळी व्यक्त केला.
यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी सांगितले की,
येतात सात तारखेला आपलं मतदान सभा आपण यूट्यूब द्वारे मोबाईल वरती बघतात प्रत्येकाचं मत ऐकून घेतात आणि आपलं मत आपण ठरवत असतो 2019 च्या निवडणुकीमध्ये माझ्या कोळी समाजाच्या योगदानावरती ज्या वळेला मी आमदार झालो त्यानंतर अडीच वर्ष ही नैसर्गिक आपत्तीत निघून गेलं तर नंतरच्या आधीच वर्षांमध्ये ज्या पद्धतीने कामाला सुरुवात झाली आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक कोळीवाड्यामध्ये महाराष्ट्र राज्य सरकारचं काम प्रत्येक ठिकाणी पोचला असं वाजवा व्यक्तिमत्व निषेध आहे त्याला दादा आणि मी आम्ही दोघांनी काम केलं तेव्हा अनेक समस्या कोळी समाजाच्या अतिशय जवळून मला माहिती आहे .आपल्या समस्या जाणून घेऊन सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून असतील प्रामाणिक प्रयत्न आला बऱ्यापैकी झाले काही आता टेंडर पूर्ण झालेली आहे त्याची कामाचा होतील तसेच तीन महत्त्वपूर्ण जेट्ट्या आपण या ठिकाणी आणलेले आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे यांना शेकाप पाठिंबा होता . आता शेकापचा अनंत गीते यांना पाठिंबा दिला आहे.आता तटकरेचे खरे नाही असे शेकाप नेते बोलत आले आहे.स्वतःचा पक्ष टिकविता आला नाही,ते दुसऱ्याचा काय विकास करणार आहे.
यावेळी आमदार रमेश पाटील यांनी सांगितले की आमदार महेंद्र दळवी यांनी कोळी समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. चारशे खासदार देशातून पाठवायचे आहेत तर रायगड मधून तटकरे यांना निवडून पाठवायचे आहे. समाजाचे काम सोडविण्याचे तटकरे करतील असा विश्वास आहे.2014 ला महायुतीच्या बाजूने होते 2017 ला जेट्टीचे काम आणले. कोणालाही आमचा विकास नको होता . कोळी समाज पाठीशी उभा राहील. देशाचे पंतप्रधान मोदी होतीलच. सुधीर मुनगंटीवार यांनी परतावा पूर्णपणे दिला आहे. कोळी समाजाचा विकास हवा असेल तर केंद्रात मोदी सरकार येणे गरजेचे आहे.मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण 2014 ते 2024 पर्यंत भारत देश आणि काय काय विकास केलेला सर्वांना ठावूक आहे.गरीबी हटाव काम मोदी यांनी केली आहे.महिला सन्मान योजना आणल्या.जो देशाचा विचार करतो तोच खरा राजा आहे राजा कसा असावा तर प्रत्युत्तर देणार असावा. ही निवडणूक देशाची आहे असेही रमेश पाटील यांनी सांगितले.यावेळी कोळी समाज बांधव सहित अलिबाग मुरुड तालुक्यातील असंख्य नागरिक उपस्थित होते.
