Home

छत्रपती शिवराय... कवयित्री जान्हवी भोईर





छत्रपती  शिवराय


छत्रपती शिवराय

घुमे अंबरात साद

सह्याद्रीच्या कपारीला

जडलाय वेडा नाद....१


रयतेच्या कल्याणाचा

ध्यास धरुनी ह्रुदयात

गुलामाची तोडी बेडी

राज्य स्थापी स्वराज्यात..२

 

रूप जगी अवतार

शिव शंभू शंकराचा 

राजा जाणता स्वरूप...३

प्रिय असे रयतेचा


प्रगटला रक्षणाला

दिन दुबळ्या कैवारी

छत्रपती शिवराय

माझा जन्मला भूवरी...४


 देवीमाय जिजामाई

न्याय धडे  शिकविले

जन कल्याणाच्या सेवे

शूर विरास वाहिले....५


घेई स्वराज्य शपथ

दिले मातेला वचन

आई माता भवानीला 

करी राजश्री नमन ...६


एक करुनी गर्जना

हर हर महादेवें

राज शिवाचा मावळा

रणांगणी सरसवे...७ 


सौ. जान्हवी भोईर

(नेरुळ)


Previous Post Next Post